वर्षभर मोफत वापरा High-speed Internet, कसं ते जाणून घ्या...

Internet Speed :  आज अनेक लोकांकडे मोबाईलमध्ये दोन सिमकार्ड असतात. एक कार्ड बॅकअपसारखे असते. तर दुसरीकडे इतरांचा वापर कॉलिंग, डेटा आणि इतर गोष्टींसाठी केला जातो. 

श्वेता चव्हाण | Updated: May 11, 2023, 05:45 PM IST
वर्षभर मोफत वापरा High-speed Internet, कसं ते जाणून घ्या... title=

High-speed Internet : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने काही दिवसांपूर्वी विविध प्लॅनमध्ये वाढ केली. असे काही प्लॅन आहेत जे 30 दिवसांची वैधता देतात. BSNL कडे असा प्लॅन आहे, जो Jio, Airtel पेक्षा दुप्पट डेटा देतो. तिन्ही कंपन्यांचे 299 रुपयांचे प्लॅन आहेत. पण ते वेगवेगळे फायदे देतात.

आज अनेक लोकांकडे दोन सिमकार्ड आहेत. त्यामध्ये एक कार्ड हे बॅकअपसाठी असते. दुसरे हे इतरांचा वापर कॉलिंग, डेटा आणि इतर गोष्टींसाठी केला जातो. जर बॅकअप असेल तर बहुतेक बीएसएनएल आहे. अनेकदा इतर कंपन्यांच्या कार्डना रेंज नसली की बीएसएनएलचेच कार्ड वापरले जाते. एवढ्यावरच न राहता तुह्मी हा प्लॅन पाहिला तर पुन्हा बीएसएनएलला दुसरे कार्ड म्हणून वापरणार नाही.

BSNL ने कॉपर कनेक्शनसाठी 250 रुपये इन्स्टॉलेशन चार्ज माफ केला आहे. तसेच, भारत फायबर कनेक्शन घेण्यासाठी कंपनीकडून 500 रुपये शुल्क माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे बीएसएनएलच्या ग्राहक संख्येत वाढ झाली आहे. BSNL भारत फायबर योजना अनेक राज्यांमध्ये प्रति महिना 329 रुपयांपासून सुरू होतात.

फायदे पाहा

ग्राहकांना 329 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 1TB डेटासह 20 Mbps पर्यंत स्पीड मिळेल. तसेच, डेटा मर्यादा गाठल्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होऊन 4 एमबीपीएस होईल. तसेच कंपनीच्या काही स्वस्तात प्लॅन आहेत. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी काही खास योजना आहेत, ज्यांना महागड्या हाय-स्पीड डेटा आणि हाय-स्पीड कनेक्शनसाठी पैसे भरावे लागले तर ते रिचार्ज योजनेचा लाभ घेऊ शकतात.

कंपनीचा फायबर रुरल होम वायफाय प्लॅन 1TB डेटासह 30 Mbps स्पीडपर्यंतचा आहे आणि हा प्लॅन फक्त देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध असेल. मात्र हा 329 रुपयांचा प्लॅन प्रत्येकासाठी उपलब्ध नाही. देशातील निवडक शहरांमधील नवीन ग्राहक कंपनीचा प्लॅन खरेदी करू शकतात.

विनामूल्य राउटर

ग्राहकांनी सहा महिन्यांसाठी विनाशुल्क प्लॅन खरेदी केल्यास त्यांना BSNL मोफत सिंगल-बँड ONT Wi-Fi राउटर मिळेल. इतकेच नाही तर 12 महिन्यांसाठी प्लॅन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ड्युअल-बँड वाय-फाय राउटर मोफत उपलब्ध असेल.