सावधान! चुकूनही घेऊ नका 'या' नंबरवरील Whatsapp Call, अन्यथा बॅक खाते होईल रिकामी!

Whatsapp Calll :  WhatsApp हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. खेड्यातील सामान्य माणसापासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण या अॅपचा वापर करतात. हे अॅप इतके लोकप्रिय आहे की त्याचा वापर करुन फ्रॉडदेखील होत आहे. जर तुम्हाला Whatsapp वर अनओळखी नंबरवरुन कॉल आला तर वेळीच सावधान व्हा... 

Updated: May 11, 2023, 03:00 PM IST
सावधान! चुकूनही घेऊ नका 'या' नंबरवरील Whatsapp Call, अन्यथा बॅक खाते होईल रिकामी! title=
WhatsApp Calls From International Numbers

WhatsApp Calls From International Numbers : जगभरातील 90 टक्के लोक फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरतात. Meta ने तयार केलेले इन्स्टंट मेसेजिंग अॅप म्हणजेच WhatsApp वर नेहमी नवनवीन अपडेट्स येत असतात. मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp जगभरातील लाखो वापरकर्त्यांद्वारे चॅटिंग आणि मेसेजिंगसाठी वापरला जातो. हल्ली WhatsApp  वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन अपडेट्स केले आहे ज्यामुळे स्पॅम कॉल्स ब्लॉक करता येऊ शकतो. 

जर तुम्हाला Whatsapp वर +212, +84, +62, +60 यासारख्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल येत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप यूजर्सना (Whatsapp Users) असे कॉल्स अचानक येत आहेत. याबाबत अनेक लोकांनी दररोज ट्विटर, फेसबुक आणि सोशल मीडियावर अशा कॉल्सबद्दल त्यांचे अनुभव शेअर करत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून व्हॉट्सअॅप कॉल्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे भारतीय सायबर सुरक्षा संघटना सतर्क झाल्या आहेत.

हे स्पॅम कॉल्स कुठून येत आहेत?

व्हॉट्सअॅप कॉल्सच्या मागे आंतरराष्ट्रीय घोटाळेबाजांचा हात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ते मालवेअरसारखे धोकादायक व्हायरस हस्तांतरित करतात. कधीकधी कॉल ब्लॉक केले जातात. अनेक वेळा व्हॉट्सअॅप इन्स्टंट कॉलद्वारे लिंक पाठवली जाते. त्या लिंकरवर क्लिक करणे म्हणजे एकप्रकारचा धोका... सध्या फ्रॉड कॉल ट्रेस करणे खूप अवघड आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा नंबरवरून आलेल्या कॉलला उत्तर देण्याची गरज नाही किंवा कॉल उचलण्याची गरज देखील नाही.  

तर स्पॅम कॉल्स असलेले मोबाइल नंबर इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया आणि इंडोनेशिया यासारख्या परदेशातून कॉल येत असल्याचे माहिती मिळत आहे. यापैकी बहुतेक कॉल +251 (इथिओपिया), +62 (इंडोनेशिया), +254 (केनिया), +84 (व्हिएतनाम) आणि इतर देशांमधून आले आहेत. हे कॉल व्हॉट्सअॅप VOIP नेटवर्कद्वारे येतात.  

चुकूनही कॉल उचलू नका..

जर तुम्ही व्हॉट्सअॅप कॉल्स चुकूनही उचलात तर फसवणुकीला बळी पडू शकता. त्यामुळे वेळीच तुम्ही सायबर सेलकडे तुमची तक्रार नोंदवा. तसेच चुकूनही या नंबरवरुन कॉल आला तर सर्वात आधी कॉल डिस्कनेक्ट करा आणि ब्लॉक करा, त्यानंतर रिपोर्ट बटणवर दाबा.  

जर तुम्हाला मेसेज येत असेल तर पहिल्या मेसेजवर चॅट स्क्रीनवर दर्शविलेल्या नंबरवर क्लिक करा. मीडिया, लिंक्स किंवा म्यूट असे विविध पर्याय दिसतील. खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला ब्लॉक आणि रिपोर्टचा पर्याय दिसेल. फक्त नंबर ब्लॉक करू नका, मग तक्रार करा. याबाबत तज्ञ्जांचे म्हणणे आहे की, यामागे मोठा आंतरराष्ट्रीय घोटाळेबाज आहे. स्कॅमर तुमचे संपर्क आणि डेटा चोरण्यासाठी या नावाखाली मालवेअर वापरत आहेत. त्यामुळे कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. तुम्ही अज्ञात लिंकरवर क्लिक करता तेव्हा तुमचा डेटा लीक होण्याचा धोका असतो. 

व्हॉट्सअॅपकडून अद्याप स्पष्टीकरण नाही

व्हॉट्सअॅपच्या या स्पॅम कॉल्सबाबत एका युजर्सने ट्विटवर तक्रार केले की, "मला दररोज व्हॉट्सअॅपवर जगाच्या विविध भागांतून अनोळखी नंबरवरून मिस्ड कॉल येत आहेत. यामुळे मला माझा फोन सायलेंटवर ठेवावा लागतो." अशी प्रतिक्रीया युजर्सने दिली आहे. मात्र याबाबत अद्याप व्हॉट्सअॅपकडून अधिकृत स्पष्टीकरण आले नाहीत.