गुगलचा थेट इशारा; 1 डिसेंबरपासून Gmail सह 'या' युजर्सचे अकाउंट होणार बंद

Google Inactive Account: गुगलकडून युजर्सना एक महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. यात गुगलकडून काही अकाउंट्स बंद करण्यात येत आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 20, 2023, 12:44 PM IST
गुगलचा थेट इशारा; 1 डिसेंबरपासून Gmail सह 'या' युजर्सचे अकाउंट होणार बंद title=
Google will delete accounts that remain inactive for 2 years from Dec 1

Google: गुगलकडून (Google) युजर्सना एक महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. आता कंपनीकडून गरज नसलेले सर्व अकाउंट बंद करण्यात येणार आहेत. म्हणजेच, ज्या अकाउंटचा वापर होत नाहीये असे अकाउंट्स (Google Account) बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. एका रिपोर्टनुसार, 1 डिसेंबर 2023पासून गुगलकडून सर्व इनअॅक्टिव्ह (Google Inactive Account) अकाउंट्स बंद करण्यात येणार आहेत. 

गुगलकडून शनिवारी एक मेल पाठवण्यात आला आहे. यात म्हटल्याप्रमाणे इनअॅक्टिव्ह अकाउंट बंद करण्यात येणार आहेत. म्हणजेच दीर्घकाळापासून ज्या अकाउंट्सचा वापर केला जात नाहीये असे अकाउंट्स आता गुगलच्या रडारवर आहेत. हे इनअॅक्टिव्ह अकाउंट्स गुगल बंद करणार आहेत. 

रिपोर्ट्सनुसार, गुगल सध्या या इनअॅक्टिव्ह अकाउंट्सबाबत थेट अॅक्शन घेत आहे. गेल्या काही वर्षांत इनअॅक्टिव्ह अकाउंट्सच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच गुगलने हे अकाउंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा युजर्स अकाउंट तयार करुन पुढे विसरुन जातात. मग कित्येक वर्षे त्या अकाउंट्सचा वापर केला जात नाही. असे अकाउंट्स आता थेट बंद होणार आहेत. खरं तर कोणतेही अकाउंटवरुन मेसेज करण्यापासून ते डेटा स्टोरेजपर्यंत भरपूर इंजिनिअरिंग वर्क आणि खर्च लागतो. म्हणूनच गुगलकडून इनअॅक्टिव्ह अकाउंट बंद करण्यात येणार आहेत. 

कोणते गुगल अकाउंट होणार बंद

1 ज्या गुगल अकाउंटवर गुगल सर्व्हिस सुरू आहे ते अकाउंट्स बंद होणार नाहीयेत. म्हणजेच तुम्ही ते अकाउंट्स वापरात नसलात तरी ते बंद होणार नाहीत. 

2 एखाद्याचे गुगल अकाउंट 2 वर्षांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय असल्यास. तसेच, जर ते अकाउंट गुगल सेवेसाठी देखील वापरले नसेल, तर असे खाते 1 डिसेंबर 2023 पासून बंद केले जाईल.

3 गुगल अकाउंट असलेल्या वापरकर्त्यांना त्यांच्या ईमेलवर संदेश पाठवून खाते बंद करण्याबद्दल सूचित केले जाईल, जेणेकरून वापरकर्ते त्यांच्या खात्यांवर डेटा स्टोअर करू शकतील.