'मी तुला मसाज देऊ का?', स्पर्धकाने ऑफर करताच वडापाव गर्ल म्हणाली, 'बाहेर बसलेला माझा नवरा...'

'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये आणखी एक एलिमिनेशन झालं असून पौलामी दास घरातून बाहेर पडली आहे. यानंतर मकबूल आणि चंद्रिका दीक्षित यांच्यात चर्चा झाली ज्यामध्ये चंद्रिकाने पतीने बिग बॉसमध्ये येण्याआधी ठेवलेली अट सांगितली. तसंच साईने आपल्याला मसाज देण्यास सांगितलं होतं अशी माहिती दिली.   

शिवराज यादव | Updated: Jul 5, 2024, 03:24 PM IST
'मी तुला मसाज देऊ का?', स्पर्धकाने ऑफर करताच वडापाव गर्ल म्हणाली, 'बाहेर बसलेला माझा नवरा...' title=

'बिग बॉस ओटीटी 3' जसजसं पुढे सरकत आहे, तसंतसं त्यामधील वाद, ड्रामा वाढत आहे. पौलामी दास बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा नॉमिनेशन एपिसोडला सुरुवात झाली आहे. यानंतर बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये नॉमिनेशन टास्कसंबंधी चर्चा सुरु आहे. या एपिसोडमध्ये वडापाव गर्ल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या चंद्रिका दीक्षितने आपल्या पतीने बिग बॉसमध्ये येण्यासाठी होकार दिला तेव्हा ठेवलेल्या अटीबद्दल माहिती दिली. तसंच जेव्हा साई केतन रावने तिला मसाज देण्याबद्दल विचारलं तेव्हा तिने नकार दिला आणि यानंतर सना मकबूलशी यासंदर्भात चर्चा केली. 

चंद्रिका दीक्षितने जेव्हा आपल्या हाताला वेदना होत असल्याचं सांगितलं तेव्हा साई केतन रावने तिला विचारलं की, 'तुला हवं असेल तर मी मसाज देतो. मी चांगली मसाज करतो'. पण चंद्रिकाने नकार दिला आणि तेथून निघून गेली. 

दुपारी जेवण्याच्या वेळी सना मकबूल आणि चंद्रिका दीक्षित एकत्र जेवत होत्या. यावेळी त्यांच्यात मसाजवरील विषयावर चर्चा सुरु झाली. चंद्रिकाने सांगितलं की, "साई म्हणतोय मी तुला मसाज देतो. मी नाही म्हटलं. मला घ्यायचं नाही. तुझी याची लायती नाही".

चंद्रिकाच्या पतीने ठेवली होती अट

चंद्रिका दीक्षितने पुढे सांगितलं की, "माझ्या मैत्रिणी महिला आहेत, ज्या माझा सांभाळ करु शकतात. मी म्हणाले, माझा नवरा बाहेर बसला आहे. तो मला खाऊन टाकेल. त्याने मला पहिली अट ठेवली होती की, चंद्रिका तू फक्त मुलीसह बेड शेअर करशील".

या आठवड्यात कोण नॉमिनेट?

दीपक चौरसिया, मुनिषा खटवानी, सना सुलतान, सना मकबुल, अरमान मलिक, विशाल पांडे, साई केतन राव आणि रणवीर शौरी यांना या आठवड्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. अनिल कपूर होस्ट करत असलेल्या बिग बॉसमध्ये आतापर्यंत 2 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत 3 एलिमिनेशन झाले आहेत. नीरज गोयत बाहेर जाणारा पहिला स्पर्धक ठरला, तर पायल मलिक दुसरी स्पर्धक ठरली.