तुम्ही Incognito मोडमध्ये सर्च करत असाल तर सावधान! Google चा मोठा खुलासा

गुगल क्रोममध्ये इनकॉग्निटो मोडचा वापर करणं निरुपयोगी आहे. खटला दाखल झाल्यानंतर गुगलने हे मान्य केलं आहे. इनकॉग्निटो मोडचा वापर केल्याने गुगलसह इतर वेबसाईट डेटा गोळा करणं थांबवत नाही.   

शिवराज यादव | Updated: Jan 22, 2024, 07:09 PM IST
तुम्ही Incognito मोडमध्ये सर्च करत असाल तर सावधान! Google चा मोठा खुलासा title=

गुगलवर युजर्स एखादा सर्च करत असताना तो जर खासगी असेल किंवा कोणापासून लपवायचा असेल तर इनकॉग्निटो मोडचा वापर केला जातो. असं केल्याने आपला डेटा इतरांपासून सुरक्षित राहतो तसंच तो कोणासोबतही शेअर होत नाही अशी युजर्सची भावना असते. पण काही वर्षांपासून गुगल इनकॉग्निटो मोडमधील डेटाही शेअर करत असल्याचा आरोप केल्यानंतर अडचणीत आलं होतं. त्यातच आता क्रोमचा इनकॉग्निटो मोड हा फारच निरुपयोगी असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान गुगलला हे मान्य करण्यासाठी 5 कोटींचा खटला कारणीभूत ठरला आहे. 

MSPowerUser हे गुगल क्रोमचं पुढील अपडेट आहे. सध्या ते बेटा मोडमध्ये आहे. MSPowerUser युजर्सना कळवणार आहे की, “तुम्ही आता इनकॉग्निटो आहात. हे डिव्हाइस वापरणाऱ्या इतरांना तुमच्या अॅक्टिव्हिटी दिसणार नाहीत. त्यामुळे तुम्ही अधिक खासगीरित्या ब्राऊझ करू शकता. यातून तुम्ही भेट देत असलेल्या वेबसाइट आणि Google सह ते वापरत असलेल्या सर्व्हिसद्वारे डेटा कसा गोळा केला जातो ते बदलणार नाही”.

गुगलचा युजर्सला नवा मेसेज

याआधी गुगल क्रोम युजर्सना इनकॉग्निटो मोडवर गेल्यावर वेगळा संदेश यायचा. त्यात लिहिलेलं असायचं की, "तुम्ही आता खासगीपणे सर्च करु शकता. हे डिव्हाइस वापरणाऱ्या इतरांना तुमच्या अॅक्टीव्हिटी दिसणार नाहीत. पण तुमचे डाऊनलोड्स, बुकमार्क आणि इतर यादी सेव्ह राहील".

गुगलला आता यात पुढे जोडावं लागलं आहे की, इनकॉग्निटो जाण्‍याने तुमचा डेटा Google सह इतर वेबसाइटद्वारे गोळा केला जाणार नाही याची खात्री होणार नाही.
 
म्हणजेच क्रोममध्ये इनकॉग्निटो मोड सुरु केल्यास इतर युजर्सला कळणार नाही, पण गुगलकडे सर्व माहिती असेल. इनकॉग्निटो मोडचा वापर करण्यामागे आपली प्रायव्हरी आणि डेटा सुरक्षित राहतो असा अर्थ असतो. Apple च्या Safari आणि DuckDuckGo चे खाजगी ब्राउझिंग थर्ड डेटा वेबसाइट्ससह डेटा शेअर करत नसल्याचा दावा करतात.

2020 मध्ये Google विरुद्ध एक खटला दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये लाखो Google वापरकर्त्यांचा समावेश होता आणि वापरकर्त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला होता. डिसेंबर 2023 मध्ये, गुगलने शेवटी हे प्रकरण निकाली काढण्यास सहमती दर्शवली आणि 5 अब्ज डॉलर्स नुकसान भरपाई देण्यास होकार दर्शवला आहे.