मुंबई : आजकाल बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन होत आहेत. कोविड काळानंतर लोकांशी डायरेक्ट संपर्क साधण्यासाठी UPI द्वारे लोक एकमेकांना पैसे ट्रांसफर करु लागले. यासाठी जास्तीचे पैसे लागत नव्हते. शिवाय यावरुन तुम्ही कितीही रक्कम दुसऱ्याला पाठवू शकता. यासाठी कोणतीही कमीत कमी रक्कम ठरवलेली नाही, त्यामुळे अगदी 1 रुपयापासून लोक पैसे पाठवू शकतात. तसेच यामुळे पैसे चोरीला जाण्याचे टेन्शन देखील कमी होते.
UPI च्या माध्यमातून गोष्टी सोप्या झाल्या आहेत. UPI हा देशातील सर्वात लोकप्रिय पेमेंट पर्याय आहे. हे 2016 मध्ये लाँच करण्यात आले होते. हे मुख्यतः पेमेंटसाठी वापरले जाते. आता एक व्यक्ती एकाधिक UPI आयडी बनवू शकते.
तसेच, हा UPI आयडी वेगवेगळ्या बँक खात्यांशी देखील जोडला जाऊ शकतो. म्हणजेच Google Pay आणि PhonePe सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बँक खात्यांचे हे वेगवेगळे UPI आयडी एकत्र करू शकता. परंतु तुम्ही UPI आयडी जनरेट करता तेव्हा त्याचा एड्रेस देखील वेगळा असतो. ज्यामुळे ही सर्वात मोठी समस्या बनली आहे.
कारण अशावेळी तुम्हाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त UPI आयडी पाहायला मिळतील आणि इतके आयडी लक्षात ठेवणेही लोकांना खूप कठीण होऊन बसतं. आज आम्ही तुम्हाला असाच एक सोपा मार्ग सांगत आहोत. ज्याद्वारे तुम्ही नको असलेले UPI आयडी सहजपणे हटवू शकता. ज्यामुळे तुम्हाला हे ऍप वापरणं देखील सोपं जाईल.
GooglePay वर UPI आयडी हटवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. Google Pay अॅपवर गेल्यानंतर, प्रोफाइल वरच्या उजव्या बाजूला दिसेल. त्यानंतर तेथे बँक खात्यावर जा.
- यानंतर, तुम्हाला जे बँक खाते हटवायचे आहे. त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला Manage UPI ID वर क्लिक करावे लागेल. आता येथे तुम्हाला सर्व UPI आयडी दिसतात. तुम्हाला UPI आयडीच्या थेट बाजूला डिलीट बटण दिसेल. तेथून तुम्ही वापरात नसलेले UPI ID डिलीट करु शकता.