मुंबई : मुंबई- पुण्या सारख्या शहरांमध्ये वाहतुक आणी ट्राफिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाचली आहे.
आजच्या डिजिटल युगामध्ये अनेक गोष्टींची उत्तर मोबाईलच्या एका क्लिकवर मिळतात. अशामध्ये आता बायकर्ससाठी गूगल मॅपने नवं फीचर आणलं आहे.
गूगल मॅपमध्ये कार, चालत जाणं, ट्रेन अशा विविध वाहतुकीच्या पर्यायांची सोय उपलब्ध आहे. परंतू टू व्हिल्सर्सचा पर्याय नव्हता. त्यामुळे आता ही सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गूगल मॅप आता बायकर्सना शॉर्ट कट्स दाखवणार आहे. सोबतच बाईक कुठे पार्क करायची याची सोयचीदेखील माहिती देणार आहे.
गूगल मॅप्सचं हे फीचर एंड्रॉयड वर्जन v9.67.1 मध्ये उपलब्ध आहे. याला मोटारसायकल मोड असं नाव देण्यात आले आहे. हे फीचर भारतामध्ये उपलब्ध आहे. 'गूगल फॉर इंडिया' या इव्हेंटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.