मुंबई : जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी गूगल ने मोबाईल डेटा वाचवण्यासाठी एक अॅप लॉन्च केले आहे.
‘Datally’ असे या अॅपचे नाव असून हे अॅप अॅनरॉईड युजर्ससाठी आहे. या अॅपमुळे स्मार्टफोनमधील अधिक डेटा वापरणारे अॅप्स मॉनेटर आणि कंट्रोल करतो. त्याचबरोबर जवळच्या वायफाय हॉटस्पॉट देखील डिटेक्ट करतो.
हे अॅप खासकरून भारतीय यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन बनवले आहे. कारण येथे मोबाईल डेटा संपण्याची भीती अधिकतर लोकांना असते. हे अॅप सुमारे ५ लाख यूजर्सच्या माध्यमातून टेस्ट केले आहे आणि या यूजर्सनी साधारणपणे ३०% डेटा या अॅपच्या मदतीने वाचवला आहे.