मुंबई : गूगलने एका अशा अॅपला पकडलं आहे जे फेसबूक, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉमवरुन फोनमधील माहिती चोरी करत असे.
हे अॅप मोबाईल फोनचे कॉल रेकार्ड देखील चोरत असे. हे काम इतक्या सोप्या पद्धतीने होत होतं की मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीला हे कळत सुद्धा नव्हतं.
एका इंग्रजी वेबसाईटच्या बातमीनुसार टीजी अॅप लोकप्रिय सोशल मीडियावरुन संवेदनशील डेटा चोरण्याचं काम करत होता. फोनमध्ये स्पाइवेयर इंस्टाल करायचा. गूगल प्ले प्रोटेक्ट सेक्युरिटी टीमला या अॅपची माहिती सप्टेंबर 2017 मध्ये डिवाईस स्कॅन करतांना मिळाली.
कंपनीने या अॅपला प्ले स्टोरमधून काढून टाकलं आहे. यामुळे प्रभावित झालेल्या सर्व डिवाइसला सूचना देखील पाठवण्यात आल्या आहेत. कंपनीने या अॅप डेवल्परच्या अकाउंटला निलंबित केलं आहे. यामध्ये म्हटलं गेलं आहे की, 'टीजी सुरवातली माहिती चोरत नव्हता जेव्हा तो प्ले स्टोरवर आला पण नंतर त्याने मोबाईल आणि इतर इलेक्ट्रिकल उपकरणांमधून माहिती चोरणं सुरु केलं.'