वर्षभरापूर्वी केवळ १०००० रुपये गुंतवले असते तर आज लखपती असता

बिटकॉईन हे एक असं चलन आहे ज्याचा उपयोग कुणीही, कधीही करू शकतो

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 30, 2017, 11:57 AM IST
वर्षभरापूर्वी केवळ १०००० रुपये गुंतवले असते तर आज लखपती असता title=

नवी दिल्ली : बिटकॉईन हे एक असं चलन आहे ज्याचा उपयोग कुणीही, कधीही करू शकतो. हे एक अभासी चलन असून त्याला बिटकॉईन हे नाव देण्यात आलं. याचा वापर तुम्ही व्हर्च्युअल ग्लोबल पेमेंट करण्यासाठी करु शकता.

बिटकॉईनची किंमत १०,००० डॉलरच्या पार

व्हर्च्युअल करंसी बिटकॉईनमध्ये एका दिवसात उंच स्तरावर पोहोचली आहे. त्यामुळे एका बिटकॉईनची किंमत १०,००० डॉलरच्या पार पोहोचली आहे. म्हणजेच भारतीय चलनात याची किंमत ६,५०,००० रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात याच्या किंमतीमध्ये ९०० टक्क्यांनी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. 

काय आहे बिटकॉईन?

बिटकॉईन एक व्हर्च्युअल करंसी (क्रिप्टो करंसी) आहे. हे चलन ऑनलाईन एक्सचेंजच्या माध्यमातून कुणीही खरेदी करु शकतं. सध्याच्या काळात भारतामध्ये एका बिटकॉईनची किंमत जवळपास ६ लाख ६५ हजार रुपयांच्या घरात आहे.

काय आहेत तथ्य?

  • संपूर्ण जगभरात एकूण १.५ कोटी बिटकॉईन चलनात असल्याचं बोललं जात आहे
  • या चलनावर सरकारचं नियंत्रण नसतं
  • या चलनाचा वापर कधीही आणि कुठेही केला जाऊ शकतो
  • हे चलन ठेवण्यासाठी बिटकॉईन वॉलेट उपलब्ध आहेत
  • बिटकॉईन हे चलन कुठल्याही देशाची अधिकारिक मुद्रा नाहीये. तसेच यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्सही लागत नाही
  • बिटकॉईन खरेदी-विक्री करण्यासाठी केवायसी (KYC) अनिवार्य आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन आणि इतर डिटेल्ससोबतच आयडी प्रमाणित करणं आवश्यक आहे
  • बिटकॉईन विक्री केल्यास तात्काळ पैसे अकाऊंटमध्ये क्रेडिट केले जाता

२००९ मध्ये बिटकॉईनची सुरुवात

२००८मध्ये पहिल्यांदा बिटकॉईनसंदर्भात एक लेख प्रकाशित झाला होता. मात्र, याची सुरुवात २००९ मध्ये सुरुवात झाली. सातोशी नाकामोटो या नावाने डिजिटल चलनाने याची सुरुवात झाली.