मुंबई : टेलिकॉम मार्केटमध्ये स्वस्त टॅरिफ प्लान लाँच करणारी कंपनी रिलायन्स जिओ तुम्हाला कमाई करण्याची संधी देतेय. यातून तुम्ही महिन्याला २५ ते ३० हजार रुपये कमवू शकता.
रिलायन्स जिओ नेटवर्क मजबूत करण्यासाठी एक लाख नवे टॉवर उभारणार आहे. गेल्या काही दिवसांत बातमी आली होती की टेलिकॉम कंपन्या कॉल ड्रॉपच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी ७४ हजार कोटी रुपये गुंतवणार आहे. यातील १६ हजार कोटी रुपये एअरटेल आणि ५० हजार कोटी रुपये जिओ गुंतवणार आहे.
जिओ येणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात एक एप्रिल २०१८मध्ये देशात एक लाख टॉवर लावणार आहे. पहिल्या टप्प्यात कंपनी टॉवर लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. कंपनीकडून गेल्या वर्षी नव्या वर्षात टॉवर लावण्याची घोषणा करणार आहे.
तुमच्याकडे टेरेस वा जमीन आहे तर तुम्ही मोबाईल टॉवरसाठी अर्ज करु शकता. कंपनीकडून तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर तुम्ही महिन्याकाठी २५ ते ३० हजार रुपयांची कमाई करु शकता.
जर तुम्हाला टेरेस वा एखाद्या मोकळ्या जागेवर टॉवर बसवायचा आहे तर कंपनीच्या नियमानुसार तितकी जागा आहे की नाही हे तपासून घ्या. टेरेसवर टॉवर लावण्यासाठी कमीत कमी ५०० स्क्वे फूट जागा असणे गरजेचे आहे. अथवा तुमच्याकडे प्लॉट असल्याचा त्याचा एरिया कमीतकमी २००० स्क्वे फूट असला पाहिजे.
टेलिकॉम कंपन्या काही प्रायव्हेट कंपन्यांच्या माध्यमातून मोबाईट टॉवर बसवतात. मोबाईल टॉवर लावणाऱ्या काही कंपन्यांमध्ये इंडस टॉवर्स, अमेरिकन टॉवर कॉर्पोरेशन, भारती-इन्फ्राटेल, एटीसी, वायोम, जीटीएल या प्रमुख कंपन्या आहेत. या कंपन्या वेगवेगळ्या जागांवर मोबाईल टॉवर लावण्याचे काम करतात. तुमच्याकडेही जागा आहे आणि त्या जागेवर मोबाईल टॉवर बसवायचा आहे तर तुम्ही संबंधित कंपन्यांच्या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.
जर तुम्ही जिओच्या टॉवरसाठी अर्ज करताय तर तुमच्याकडे जमिनीच्या पेपरची फोटोकॉपी, एनओसीचे पेपर, लँड सर्व्हे रिपोर्ट आणि आयडीप्रूफ असणे गरजेचे असते.