मुंबई : तुम्ही रिलायन्स जिओ (Reliance Jio)चे ग्राहक आहात, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून जिओची प्राइम मेंबरशिप (Jio Prime Membership) संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, कंपनीने आपल्या ग्राहकांना गुडन्यूज दिलेय. जिओने शुक्रवारी सायंकाळी प्राइम मेंबरशिप ग्राहकांना एका वर्षाची मुदत वाढ दिलेय. तशी घोषणा कंपनीने केली आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१९ पर्यंत त्याचा ग्राहकांना लाभ घेता येईल.
जिओची प्राइम मेंबरशिप १ एप्रिल २०१८ पासून पुढील एक वर्षापासून वाढविण्यात येणार आहे. याचा लाभ हा जिओच्या सर्व ग्राहकांना होणार आहे. जिओच्या सर्व प्राइम मेंबर जे ३१ मार्च पर्यंत या सुविधेचा लाभ घेत आहेत. त्यांना आता पुढील एकवर्ष ही सुविधा मिळणार आहे. त्यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारावे लागणार नाही. तर नवीन सदस्यांना जिओची Prime Membership ही ९९ रुपयांना मिळणार आहे.
जिओचे जे प्राइम मेंबर आहेत त्या सर्व ग्राहकांना देशातील मोफत व्हाईस कॉल, ४ जी डाटा आणि एसएमएसची सुविधा मिळत आहे. जिओच्या या सुविधा आता पुढील वर्षापर्यंत मोफत राहणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा प्राईस वॉर आणि डाटा वॉर सुरु होण्याची शक्यता आहे.