रिलायन्स जिओची नवी ऑफर ; मिळेल 2200 रुपयांचे कॅशबॅक आणि 60 जीबी डेटा फ्री

रिलायन्स जिओ नेहमीच दुसऱ्या कंपन्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्याच्या प्रयत्नात आहे.

Updated: Mar 30, 2018, 02:53 PM IST
रिलायन्स जिओची नवी ऑफर ; मिळेल 2200 रुपयांचे कॅशबॅक आणि 60 जीबी डेटा फ्री title=

मुंबई : रिलायन्स जिओ नेहमीच दुसऱ्या कंपन्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी जिओ सातत्याने नवनवे ऑफर्स सादर करत आहे. आता जिओने 2200 रुपयांची कशबॅक ऑफर सादर केली आहे. यासाठी जिओने नोकियाशी हातमिळवणी केली आहे. यापूर्वी जिओने अॅपल आणि फोन निर्माता कंपनींशी करार केला होता. याचा फायदा नेहमीच युजर्संना मिळत आला आहे. तर जाणून घेऊया या खास ऑफरबद्दल...

नोकिया 1 सोबत कशबॅक ऑफर

अलिकडेच HMD ग्लोबलने नोकियाचा सर्वात स्वस्त अॅनरॉईड स्मार्टफोन नोकिया-1 भारतात लॉन्च केला. अॅनरॉईड ओरियोसोबत स्मार्टफोन भारतात 5,499 रुपयांना लॉन्च करण्यात आला. हा  सर्वात स्वस्त स्मार्टफोन दुकानांमध्ये उपलब्ध आहे. युजर्संना या स्मार्टफोनवर 2200 रुपयांचे कॅशबॅक मिळेल. त्यामुळे हा फोन तुम्हाला 3299 रुपयांना उपलब्ध होईल.

प्राईम मेंबर्संना मिळणार कॅशबक

रिलायन्स जिओचे प्राईम मेंबर्संना नोकिया1 वर 2200 रुपयांचे कशबॅक मिळत आहे. या कशबॅकमध्ये 50 रुपयांचे एकूण 44 कूपन्स मिळत आहेत. कूपन्स MyJio अॅप्सवर मिळतील. याचा वापर युजर्स रिचार्ज करण्यासाठी करु शकतील. मात्र ही ऑफर फक्त दोन दिवसांसाठी आहे. यासाठी तुम्हाला नोकिया-1 स्मार्टफोन 31 मार्चपर्यंत खरेदी करावा लागेल.

मिळेल 60 जीबी फ्री डेटा

कशबॅकसोबत नोकिया-1 खरेदी करणाऱ्यांना जिओकडून 60 जीबी डेटा मिळेल. प्रत्येक रिचार्जवर युजरला 10 जीबी अॅडिशनल डेटा मिळेल आणि अशाप्रकारे एकूण 6 रिचार्जवर 10 जीबी अॅडिशनल डेटा मिळेल. हा फ्री डेटा 30 जून 2018 पर्यंत केल्या जाणाऱ्या रिचार्जवरच मिळेल.

नोकिया-1 ची खासियत

  • नोकिया-1 कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन.
  • 4.5 इंचाचा डिस्प्ले
  • पॉली कार्बोनेटमधून डिझाईन केला गेला.
  •  1GB रॅम
  •  मीडियाटेक एमटी 6737 प्रोसेसर
  •  एलईडी फ्लॅशसोबत 5 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा
  •  2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
  •  2150mAh ची बॅटरी
  •  वायफाय आणि ब्लूटुथ सारखे कनेक्टिव्हिटीचे पर्याय.