नको त्या Email नं भरलंय Gmail अकाऊंट? या एका ट्रिकनं करा क्षणात डिलीट

पाहा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा सोपी ट्रीक 

Updated: Aug 1, 2022, 11:32 AM IST
नको त्या Email नं भरलंय Gmail अकाऊंट? या एका ट्रिकनं करा क्षणात डिलीट  title=
Gmail acount is full with unwanted mail read this Trick details

मुंबई : नोकरीच्या ठिकाणी किंवा कोणत्याची महत्त्वाच्या गोष्टीसाठी संपर्क साधायचा झाल्यास Gmail चा वापर केला जातो. जीमेल तुमच्यासाठीही नवं नसावं. आजच्या घडीला अब्जोंच्या संख्येनं युजर्स या सेवेचा वापर करतात. पाहता पाहता Gmail चा मेलबॉक्स कामाव्यतिरिक्त असणाऱ्या मेलनंही खच्चून भरतो. त्यातले काही मेल जाहिराती किंवा काही स्पॅम असतात. बरं हे मेल स्टोरेज फुल करतास आणि त्यामुळं होणारा मनस्ताप वेगळा. 

बरं मेल डिलीट करायचं म्हटलं तर ते सिलेक्ट करा, कुठे चुकीच्या ठिकाणी क्लिक झाल्यास त्यानंतर पुन्हा ही सर्व प्रक्रिया करा आणि पुन्हा शेवटी हाती मनस्तापच. पण, आता चिंता करण्याचं कारण नाही. आता एक ट्रीक वापरून तुम्ही नको असणारे मेल अगदी सहज डिलीट करु शकता. 

यासाठी सर्वप्रथम जीमेल अकाऊंट सुरु करून  "has:attachment larger:10M" टाईप करा. यामुळे 10 एमबीपेक्षा मोठे मेल इथं सर्च केले जातील. तुम्हाला आणखी मोठ्या फाईल डिलीट करायच्या आहेत तर, 10 ऐवजी दुसराच कोणता आकडा टाईप करा. 

जीमेलच्या ट्रॅश ऑप्शनमध्ये जाऊनही तुम्ही नको असणारे मेल डिलीट करु शकता. इथं जुने मेल टाईप करण्यासाठी तुम्ही सेंडरचं (पाठवणाऱ्याचं) नाव टाईप करा. सर्व मेल आल्यानंतर ते डिलीट करु शकता. 

सुरुवातीला गरज नसणारे ईमेल अनसब्सक्राइब करा. असं केल्यानंतर मेल बंद होण्यासाठी काही दिवसांचा वेळ लागतो. एकदा गूगल फोटो लायब्ररीलाही भेट द्या. गरज नसणारे फोटोही डिलीट करा. 

अगदीच गरज वाटल्यास फक्त फोटोंसाठी नवा ईमेल आयडी तयार करा. असं केल्यास फोटोंसाठी स्वतंत्र मेलही असेल आणि तुमच्या कामासाठीच्या मेल आयडीवरील ताणही कमी होईल.