599 रुपयांचा Mi Earphones मिळतोय फक्त 1 रुपयात, फक्त इतकंच करा

Xiaomi च्या Mi.com या वेबसाइटवर एक धमाकेदार ऑफर सुरु आहे. कंपनीकडून महागडे Mi इअरफोन्स हे फक्त 1 रुपयात दिले जात आहेत.

Updated: Aug 22, 2022, 07:24 PM IST
599 रुपयांचा Mi Earphones मिळतोय फक्त 1 रुपयात, फक्त इतकंच करा     title=

मुंबई :  Xiaomi च्या Mi.com या वेबसाइटवर एक धमाकेदार ऑफर सुरु आहे. कंपनीकडून महागडे Mi इअरफोन्स हे फक्त 1 रुपयात दिले जात आहेत.  एमआयच्या या एअरफोन्सची किंमत ही  599 रुपये इतकी आहे. मात्र कंपनी ऑफरमध्ये हे एअरफोन्स फक्त 1 रुपयात देतेय. या ऑफरचा लाभ कसा घ्यायचा, हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (get 599 ruppes mi earphones only 1 ruppes on redmi note 11 pro 5g smart phone shopping)
 
या ऑफरचा फायदा घेण्यासाठी कंपनीकडून एक अट ठेवण्यात आली आहे.  Redmi हा Xiaomi चा सब-ब्रँड आहे. या रेडमीद्वारे मिड-रेंज स्मार्टफोन असलेला Redmi Note 11 Pro Plus 5G हा मोबाईल खरेदी करावा लागणार आहे. या मोबाईल खरेदी केल्यानंतरच तुम्हाला या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. या मोबाईलवर  अनेक आकर्षक ऑफर्सचा समावेश आहे. यामध्ये  इंस्टंट डिस्काउंट,  कॅशबॅक आणि इतर ऑफर्सचा समावेश आहे.

ऑफर्स

रेडमी नोट प्रो प्लस 5 जी आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार केल्यास 2 हजार रुपयांपर्यत इंस्टंट डिस्काउंट मिळेल.  Paytm वॉलेट/पोस्टपेडद्वारे व्यव्हार केल्यास 10 टक्के (1 हजार रुपये) कॅशबॅक, ग्राहकांच्या सुविधेसाठी बिनव्याजी इएमआय सुविधा, 2 महिन्यांसाठी फ्री युट्यूब प्रीमिअम मेंबरशीप आणि 599 रुपयांचा असलेला Mi Earphones फक्त 1 रुपयात मिळणार आहे. 

Redmi Note 11 Pro+ 5Gची किंमत किती?

या मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आहे. सोबतच 128 जीबी तगडा स्टोरेज आहे. या स्मार्टफोनची किंमत ही 19 हजार 999 रुपये इतकी आहे. तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत  22 हजार 999 इतकी आहे.  तर 8 जीबी रॅम 256  जीबी स्टोरेज असलेल्या मॉडलची किंमत ही  24 हजार 999 इतकी आहे.