मुंबई: संवादाचा आजच्या घडीचं सर्वात मोठं माध्यम म्हणजे Whatsapp आहे. अगदी ऑफिसपासून ते टाइमपास गप्पा मारण्यापर्यंत Whatsapp वापरलं जातं. पण त्यासोबत आपल्या फोनमध्ये अनेक अॅप असतात त्यातला एक अॅप तुमच्या Whatsapp साठी घातक ठरू शकतं. हे अॅप कोणतं आहे आणि त्यामुळे आपलं Whatsapp कसं ब्लॉक होऊ शकतं जाणून घेऊया.
Whatsapp कडून एक निवेदन जारी करण्यात आली आहे. या निवेदनानुसार जर कोणी Whatsapp व्यतिरिक्त WhatsApp Plus किंवा GB Whatsapp सारखे अॅप वापरत असेल तर तुमचं पर्सनल किंवा ओरिजनल व्हॉट्सअॅप अकाऊंट ब्लॉक होण्याची शक्यता आहे. या दोन्ही अॅपवर Whatsapp पेक्षा वेगऴे आणि विशेष फीचर्स उपलब्ध असल्याने अनेकजण हे अॅप वापरतात.
Whatsapp plue चा वापर करू नये असंही सांगण्यात आलं आहे. मूळ Whatsapp मध्ये एन्ड टू एन्ड प्रायवसी देण्यात आली आहे. त्यामुळे तुमचं चॅट सुरक्षित राहू शकतं. मात्र Whatsapp plueमध्ये अशा कोणत्याच गोष्टी तुम्हाला मिळत नाहीत. त्यामुळे तुमचं अकाऊंट हॅक होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारचे अॅप हे फोन आणि सिस्टिमसाठी धोक्याचे ठरू शकतात.
एका रिपोर्टनुसार Whatsapp plue सारखे अॅप अनऑफिशियल व्हर्जन असतात. यामध्ये चॅट शेड्युलिंग, ऑटो रिप्लाय आणि असे अनेक फीचर्स उपलब्ध असतात. मात्र सुरक्षा आणि हॅकिंगचा धोका देखील तेवढाच वाढतो. Whatsapp देखील असे फीचर्स आणण्यावर काम करत आहे. ज्यामुळे युझर्स अशा अनऑफिशियल अॅपचा वापर करणार नाहीत.
तुमच्याकडेही जर यापैकी कोणतंही अॅप असेल आणि तुम्ही ते वापरत असाल किंवा फ्रेंण्ड ग्रूपमध्ये कोणी वापर असेल तर त्याला हे अॅप न वापरण्यासाठी सल्ला द्या. सुरक्षित असलेलं ओरिजनल Whatsapp वापरा आणि आपला डेटा सुरक्षित ठेवा ज्यामुळे हॅकिंगचा धोका पोहोचणार नाही.