Flipkartवर वस्तू खरेदी करताना ग्राहकांना अडचणी, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस

Flipkart Users Problem: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर अनेक ग्राहकांना वस्तू खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी या तक्रारी फ्लिपकार्टला पाठवल्या पण दिलासा न मिळाल्याने त्यांनी आता ट्विटरवर तक्रारी लिहिल्या आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 13, 2023, 10:02 AM IST
Flipkartवर वस्तू खरेदी करताना ग्राहकांना अडचणी, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस  title=

Flipkart Users Problem: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सेल सुरू असून देशभरातील ग्राहक या संधीचा फायदा घेत आहेत. येथे तुम्हाला स्पोर्ट्स आणि फिटनेस उत्पादनांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळतेय तर काही बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10 टक्के त्वरित सूट देखील मिळू शकते. असे असताना अनेक ग्राहकांना वस्तू खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी या तक्रारी फ्लिपकार्टला पाठवल्या पण दिलासा न मिळाल्याने त्यांनी आता ट्विटरवर तक्रारी लिहिल्या आहेत. 

वस्तू रिटर्न होत नसून पेमेंटदेखील परत मिळत नसल्याचे एका युजरने ट्वीटरवर लिहिले आहे. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅप्लीकेशन लोड व्हायला वेळ लागत असल्याचेही एका युजरने लिहिले आहे.

माझी परवानगी नसताना मी केलेली ऑर्डर रद्द करण्यात आल्याचे डॉ. प्रयास शर्मा यांनी फ्लिपकार्टला उद्देशून लिहिले आहे. रिशी श्रीवास्तव या युजरनेदेखील आपला राग व्यक्त केला आहे.काही कारण न देता माझे रिफंड रद्द केले आणि आता ईयरफोन घ्यायलादेखील कोणी येत नाही. माझी अडचण सोडवली नाही तर मी तक्रार करेन असा इशारा त्याने फ्लिपकार्टला दिला आहे. 

फ्लिपकार्टवर तक्रार कशी करावी?

फ्लिपकार्ट वापरताना अनेकदा युजर्सना अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी फ्लिपकार्ट अ‍ॅप किंवा वेबसाइटवर जाऊन तुम्ही त्यासंदर्भात तक्रार दाखल करु शकता. यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट अ‍ॅप किंवा वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर हेल्प सेंटरमध्ये जा. तेथे मॅनेज ऑर्डर, रिटर्न अ‍ॅण्ड रिफंड, हेल्प विथ अदर इश्यू, कॉंटॅक्ट सेलर असे पर्याय दिसतील. यातील तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडा आणि आपली तक्रार दाखल करा. 

फ्लिपकार्टच्या ऑफरचा आजचा शेवटचा दिवस आहे. यामध्ये  ग्राहकांना 80 टक्के सवलतीत सर्व प्रकारच्या वस्तू ऑनलाइन खरेदी करता येणार आहेत. या सेलमध्ये 1 लाखांहून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत.

कोणत्या वस्तू खरेदी कराल?

सर्वात कमी किंमत (Flipkart big bchat dhamal best deals) बजेट मार्केट श्रेणी देखील सेलमध्ये ठेवण्यात आली आहे. Rs.499, Rs.699, Rs.799 आणि Rs.999 च्या किमतीच्या श्रेणीमध्ये खरेदी करण्याची संधी देखील आहे. तर फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट टीव्ही, कपडे, गृहोपयोगी वस्तू, सजावट आणि फर्निशिंग, फर्निचर, किराणा, सौंदर्य आणि मेकअप उत्पादने खरेदी करू शकता.

या ऑफरमध्ये स्पोर्ट्स आणि फिटनेस उत्पादनांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट, घरगुती उपकरणांवर 70 टक्क्यांपर्यंत सूट, वॉशिंग मशिनवर 60 टक्क्यांपर्यंत सूट, पुरुषांच्या कपड्यांवर 60-70 टक्क्यांपर्यंत सूट, पर्सनल केयरवर 60 टक्क्यांपर्यंत सूट तर किराणा मालावर 70 टक्के सूट मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेलमध्ये तुम्ही एयू स्मॉल फायनान्स बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि येस बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10 टक्के त्वरित सूट देखील मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला सेलला भरपूर फायदा होणार आहे. विविध ऑफर्स अंतर्गत तुम्ही सौंदर्य, मेकअप, शूज, कपडे इत्यादी वस्तू स्वस्तात खरेदी करू शकता. त्यामुळे महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात खरेदी पहायला मिळत आहे.