फ्लिपकार्ट सेल सुरू! मिळणार 80 टक्क्यापर्यंत सूट, 'या' वस्तुंवर मिळणार डिस्काउंट

Flipkart Big End of Season Sale: फ्लिपकार्टवर सेल सुरू असून या दरम्यान ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तुंवर सूट मिळणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 3, 2024, 04:22 PM IST
फ्लिपकार्ट सेल सुरू! मिळणार 80 टक्क्यापर्यंत सूट, 'या' वस्तुंवर मिळणार डिस्काउंट title=
Flipkart Big End of Season Sale Goes live and get upto 80 percent discount check details

Flipkart Big End of Season Sale: दिवाळी, नवीन वर्ष, नाताळ यासारख्या सणांच्या दिवशी ई-कॉमर्स वेबसाइटवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सेल असतात. यावेळी मोठ्या प्रमाणात डिस्काउंट व ऑफर दिल्या जातात. मात्र, आता कोणाताही सण नसताना देखील फ्लिपकार्टवर सेल सुरू आहे. Flipkart Big End of Season Sale सध्या सुरू आहे. या सेलच्या दरम्यान स्मार्टफोन, गॅजेट आणि अॅक्सेसरीज व्यतिरिक्त फॅशन प्रोडक्टवर चांगले डिस्काउंट मिळत आहेत. 

Flipkart वर लिस्टेड डिटेल्सनुसार, या सेलच्या दरम्यान जास्तीत जास्त 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा ग्राहक घेऊ शकतात. smart gadget आणि Accessoriesवर 50 ते 80 टक्क्यापर्यंतची सूट मिळत आहे. त्याव्यतिरिक्त स्मार्टफोनवरदेखील 80 डिस्काउंट मिळत आहे. Flipkart Saleच्या दरम्यान ग्राहकांना इन्संट 10 टक्क्यांपर्यंत डिस्काउंचा मिळू शकते. त्यासाठी Flipkart UPIचा वापर करावा लागेल, मात्र, त्यासाठी काही नियम व अटी लागू असणार आहेत. 

स्मार्टफोनवर मिळतोय भरघोस डिस्काउंट

Flipkart Saleच्या दरम्यान अनेक स्मार्टफोन्सदेखील लिस्टेड केले आहेत. येथे तुम्हाला काही स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. iPhone पासून ते Andriod स्मार्टफोनदेखील तुम्ही स्वस्तात खरेदी करु शकता. या दरम्यान Motorola, Redmi आणि Samsung सह अनेक ब्रँडच्या फोनवर डिस्काउंट मिळत आहे. 

TWS ते पॉवरबँकपर्यंत मिळतेय सूट 

Flipkartच्या या सेलमध्ये स्मार्ट गॅजेटदेखील आहेत. ज्यावर खूप चांगले डिस्काउंट मिळत असून तुम्ही ते स्वस्तात खरेदी करु शकता. या सेलमध्ये हेडफोन, TWS, Smartphone, मोबाइल अॅक्सेसरीज, स्पीकर अँड साउंडबार, पॉवरबँक आणि स्मार्ट होमसारखे डिव्हाइस खरेदी केले जाऊ शकतात. 

ब्रँडेड शूज आणि कपड्यांवर देखील डिस्काउंट

Flipkart Sale मध्ये ब्रँडेड शूज कपडे, घड्याळ यासारख्या वस्तुंवरदेखील डिस्काउंट मिळत आहे. कंपनीचा दावा आहे की, अनेक कपड्यांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळतेय. त्याचा फायदा ग्राहक घेऊ शकता. इतकंच नव्हे तर, Pume Shoesवर कमीत कमी 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळतेय.