ऑफर का बाप! Flipkart वर आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल

Flipkart Sale मध्ये फॅशन प्रोडक्टवरही भरगोस सूट मिळणार आहे. 

Updated: May 31, 2022, 05:53 PM IST
ऑफर का बाप! Flipkart वर आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल title=

मुंबई : तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आणि महत्त्वाची आहे. फ्लिपकार्ट जून महिन्यात खास ग्राहकांसाठी सेल आणत आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर Big Bachat Dhamaal Sale हा सेल आहे. हा सेल 3 जून पासून 5 जूनपर्यंत असणार आहे. 

Flipkart Sale मध्ये तुम्हाला अनेक इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूंवर भरगोस सूट मिळू शकते. याशिवाय तुम्हाला काही खास ऑफर्सही मिळू शकतात. फ्लिपकार्टवरून पेमेंट करणाऱ्यांना 150 रुपयांपर्यंत सूटही देण्यात आली आहे. 

सेलशी संबंधीत कोणत्या ऑफर्स असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र स्मार्टफोन, टीवी, रेफ्रिजरेटरवर भरगोस सूट मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

फ्लिपकार्टवरील धमाल सेलमधील नवीन डील दररोज दुपारी 12 वाजता, सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता सुरू होणार आहे. दुसरीकडे, स्वस्तात उत्पादन घ्यायचे असेल, तर तुम्हाला दररोज दुपारी 12 ते रात्री 10 वाजता सेलमध्ये सहभागी व्हावं लागणार आहे.

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सवर भरगोर डिस्काउंट

Flipkart Sale मध्ये फॅशन प्रोडक्टवरही भरगोस सूट मिळणार आहे. याशिवाय मोबाईल खरेदीवर डिस्काउंट मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्सेसरीजवर डिस्काउंट मिळणार आहे. 

टीव्ही आणि फ्रीजवर मोठी बचत करण्याची संधी

जर तुम्ही नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला विक्रीमध्ये मोठी बचत करण्याची संधी मिळेल. विक्रीसह तुम्ही 70% पर्यंत सूट देऊन टीव्ही खरेदी करण्यास सक्षम असाल. तुम्ही किचन उपकरणे 299 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता.

रेफ्रिजरेटर्सच्या सेलमध्येही चांगली सूट मिळणार आहे. येथून तुम्ही 55% पर्यंत सूट देऊन फ्रीज खरेदी करू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला फ्लिपकार्ट ओरिजिनल्स आणि फर्निचरवरही सूट मिळेल.