फेसबूकवर लवकरच डिसलाईकचा पर्याय उपलब्ध होणार

फेसबूकवर लवकरच डिसलाईक येऊ शकतं, याविषयीचे सर्व प्रयोग फेसबुकने सुरू केले आहेत.

Updated: May 2, 2018, 07:08 PM IST
फेसबूकवर लवकरच डिसलाईकचा पर्याय उपलब्ध होणार title=

मुंबई : फेसबूकवर लवकरच डिसलाईक येऊ शकतं, याविषयीचे सर्व प्रयोग फेसबुकने सुरू केले आहेत, काही देशातील निवडक युझर्सना ही सुविधा प्रथम टेस्टिंगसाठी देण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून युझर्स फेसबुकला डिसलाईक बटन देण्याची मागणी करत होते. मात्र फेसबुक या बटनला डिसलाईक बटन नाही तर डाऊन अॅरो म्हणून देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, हे बटन एक डाऊन ओटसारखं काम करणार आहे, अप-डाऊन थम्बच्या जागी बाणाचं निशाण असणार आहे, आवडलं तर वरच्या दिशेच्या बाणाला तुम्ही क्लिक करू शकतात, नाही आवडलं तर खालच्या दिशेने जाणाऱ्या बाणावर क्लिक करावं लागेल. याला डाऊन ओट, अप ओट असं म्हटलं जात आहे.

शिवीगाळ किंवा अपमानास्पद कमेंन्टसला लागणार चाप

फेसबुकने म्हटलंय, ही सुविधा शिवीगाळ किंवा अपमानास्पद कमेंन्टससाठी असणार आहे, यामुळे ज्यांना जास्त डाऊन ओट पडतील, ती प्रतिक्रिया-पोस्ट टॉपला दिसणार नाही. हे बटन रेडिटच्या डाऊनओट प्रमाणे काम करणार आहे, यावर तुमच्या पोस्टला डिसलाईक का केलं यावर लोक प्रतिक्रिया व्यक्त करू शकतील. या दरम्यान सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अशा कमेंन्टसना कमी महत्व मिळेल, जे चर्चे दरम्यान वाईट कारणांनी, प्रतिक्रियांनी जास्त लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

फेसबुक २०१५ पासून डिसलाईक बटन इंटीग्रेट करण्यासाठी संघर्ष करीत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी, सोशल मीडियाच्या दिग्गजांनी रिअॅक्शन्स फीचरती सुरूवात केली. मात्र पोस्टवर रागीत चेहऱ्याचा आयकॉन पोस्ट करणे, देखील एका प्रकारे रिअॅक्शन मानली जाते.