नवी दिल्ली : 'फेक न्यूज' आणि त्या व्हायरल होण्याचा इंटरनेटवरील बलाढ्य कंपन्या फेसबुक, ट्विटर आणि गुगलला चांगलाच फटका बसला आहे. फेकन्यूजवरून आलेल्या तक्रारीच्या प्रमाणात वाढ झाली असून, त्याचा फटका थेट आर्थिक स्वरूपात बसू लागला आहे.
दरम्यान, कोणत्याही वादग्रस्त मजकुरासोबत आपली जाहीरात यावी असे कोणत्याही कंपनीला वाटत नाही. त्यामुळे अनेक कंपन्यांनी 'फेक न्यूज'सोबत जाहिरात दाखवली जाण्याच्या भीतीने फेसबुक, ट्विटर आणि गुगल सारख्या कंपन्यांच्या वेबसाईटला जाहीरातीच द्यायला नकार द्यायला सुरूवात केली आहे. हा नकार केवळ भारतातच नव्हे तर, जगभरातील अनेक देशांतील कंपन्यांकडून मिळत आहे. त्यामुळे फेक न्यूज' या प्रकारमुळे फेसबुक, ट्विटर आणि गुगल आदी कंपन्यांना त्याचा आर्थिक फटका बसताना दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार, डिजिटल मीडियाचे स्ट्रॉन्ग नेटवर्क वापरून आर्थिक उत्पादन वाढविण्याचा या कंपन्यांचा विचार होता. मात्र, 'फेक न्यूज'मुळे त्यांना चांगलाच फटका बसला आहे.
जगभरात झालेली मोबाईल क्रांती आणि इंटरनेटचा वापर यांमुळे उपलब्ध झालेला सोशल मीडियाचा प्लॅटफटर्म अनेक कंपन्यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला आहे. फेसबुक, ट्विटर आणि गुगल या कंपन्या यात आघाडीवर आहेत. मात्र, मंध्यंतरीच्या काळात या कंपन्यांच्या वेबसाईटवरून अनेक 'फेक न्यूज' प्रसारित करण्यात आल्या. ज्या वादग्रस्त, असत्य आणि वाईट अशयाच्या होत्या. वादग्रस्त असल्यामुळे अर्थाच या न्यूज सोशल मीडियातून चांगल्याच व्हायरल झाल्या. त्यामुळे कंपन्यांनीही मग व्हायरल झालेल्या न्यूज सोबत जाहिराती दाखवण्यास सुरूवात केली.