मुंबई : सोशल मीडियातून पैसे कमावणे आता अधिक सुलभ आणि सोपे होणार आहे. (Earn money from Social Media) फेसबूक (Facebook )कंपनी लवकरच एक नवीन अॅप बाजारात आणणार आहे. ज्यामध्ये आपण सर्व्हेक्षण, संशोधन आणि काही कामे करून घरातून पैसे कमवू शकता. या अॅपला फेसबूक व्ह्यूपॉईंट (Facebook ViewPoint ) असे नाव दिले जाईल. याच्या माध्यमातून Short Video शेअर करुन मोठी कमाई करु शकता.
फेसबूकने नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध केले आहे की, आता यूजर्सनी अपलोड केलेल्या लहान व्हिडिओंच्या बदल्यात पैसे दिले जातील. कंपनी वापरकर्त्यांच्या आशयाची जाहिरात करेल आणि कंपनी त्यातून मिळणाऱ्या कमाईचा काही हिस्सा त्यांना देण्यात येईल. तर उर्वरित रक्कम व्हिडिओ निर्मात्याच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. फेसबूक प्रॉडक्ट मॅनेजर एरेझ नावे यांच्या म्हणण्यानुसार कंपनीने आपला यूजर बेस वाढवण्यासाठी हे अॅप लॉन्च करण्याची योजना आखली आहे.
आमची सहयोगी वेबसाइट 'झी बिझनेस'च्या वृत्तानुसार, फेसबूक 3 किंवा अधिक मिनिटांच्या व्हिडिओ (Monetize) करेल. या व्हिडिओंमध्ये 30-45 सेकंदांची जाहिरात दिली जाईल आणि त्या बदल्यात यूजर्सला पैसे दिले जातील. येत्या काही आठवड्यांत या प्रक्रियेची चाचणी सुरू होईल, असे फेसबूकने म्हटले आहे. एकदा यशस्वी चाचणी सर्व वापरकर्त्यांसाठी लागू होईल. सुरुवातीला हे अॅप फक्त अमेरिकन वापरकर्त्यांसाठी लॉन्च केले जाईल. परंतु कंपनी लवकरच हे अॅप भारत आणि इतर देशांच्या यूजर्ससाठी उपलब्ध करुन देणार आहे.