व्हॉट्स अ‍ॅप वापरणे होणार खर्चिक

 व्हॉट्स अ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप झपाट्याने प्रसिद्ध झाले. 

Updated: Sep 6, 2017, 03:01 PM IST
व्हॉट्स अ‍ॅप वापरणे होणार खर्चिक  title=

मुंबई :  व्हॉट्स अ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप झपाट्याने प्रसिद्ध झाले. 

कालांतराने ते फेसबुकने विकत घेतले. केवळ इंटरनेटच्या मदतीने मोफत मेसेज, व्हिडीओ आणि फोटो पाठवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवर आता कॉलिंगची सोय करण्यात आली. पण येत्या काही दिवसांमध्ये व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. 

 ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने जाहीर केलेल्या अहवालामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. १०० कोटींहून अधिक यूजर्स व्हॉट्सअॅप वापरतात. त्याच्या वापरासाठी यूजर्सकडून पैसे घेतल्यास फेसबुकला मोठा नफा होईल, असे सांगण्यात येत आहे.सध्या व्हॉट्सअॅपमध्ये काही फिचर्सची चाचणी केली जात आहे. या नवीन फिचर्सचा वापर करुन ग्राहकांना पसंतीनुसार कंपन्यांबरोबर थेट संवाद साधण्याची सोय उपलब्ध होणार आहे, असे व्हॉट्सअॅपच्या एका ब्लॉग पोस्टद्वारा सांगण्यातआले आहे. 

सुरूवातीला  लहान कंपन्यांना मोफत व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप्लिकेशन दिले जाईल. या नव्या अॅपमध्ये व्यापार वाढवण्यासाठी कंपन्यांना खास टूल्स उपलब्ध देण्यात येईल. तर विमान कंपन्या, ई-कॉमर्स साईट्ससारख्या कंपन्यांना या अॅपच्या अॅडव्हान्स अवृत्तीमध्ये एकाच वेळेस हजारो ग्राहकांशी संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.

व्हॉट्सअॅपने सध्या प्रायोगिक तत्वावर कंपन्यांना व्हेरिफाईडची टीक देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सेव्ह केलेल्या फोन क्रमांकासमोर हिरवी टीक दिसेल. याचा अर्थ संबंधित कंपनी व्हॉट्सअॅपने व्हेरिफाइड केली आहे. भविष्यात या सोयीसाठी व्हॉट्सअॅप या कंपन्यांकडून पैसे घेणार असल्याची माहिती व्हॉट्सअॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅड इडेमा यांनी मुलाखतीमध्ये दिली आहे.