रक्तदानासाठी 'फेसबुक'चं नवं फिचर

आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी रक्ताची गरज असेल तर हमखास फेसबुक पोस्टचा वापर करून व्यक्ती लोकांना रक्तदानासाठी आवाहन करताना दिसतात... रक्तदात्यांशी संपर्क करण्याची हीच गरज आणि वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन फेसबुकनं एक खास फिचर लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Sep 28, 2017, 06:17 PM IST
रक्तदानासाठी 'फेसबुक'चं नवं फिचर   title=

मुंबई : आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी रक्ताची गरज असेल तर हमखास फेसबुक पोस्टचा वापर करून व्यक्ती लोकांना रक्तदानासाठी आवाहन करताना दिसतात... रक्तदात्यांशी संपर्क करण्याची हीच गरज आणि वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन फेसबुकनं एक खास फिचर लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. 

फेसबुकच्या या फिचरवर गरजवंत आणि ब्लड बँका सहजरित्या रक्तदात्यांशी संपर्क साधू शकतील. येत्या १ ऑक्टोबरपासून फेसबुकचं एक नवं फिचर युझर्ससमोर येईल.

यामध्ये फेसबुक युझर्सच्या न्यूज फीडमध्ये एक मॅसेज दिसेल. या माध्यमातून रक्तदानासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तसंच रक्तगटाची माहिती देण्यासाठी सांगितलं जाईल. युझरनं याआधी रक्तदान केलंय का? याबद्दलची विचारणाही केली जाईल. 

गरजू व्यक्ती एका खास पोस्टच्या माध्यमातून रक्तगट, हॉस्पीटलचं नाव आणि संपर्क क्रमांक शेअर करू शकतील. 

विविध ब्लड बँकांनी आणि हॉस्पीटल्सनी फेसबुकच्या या नव्या फिचरचं स्वागतच केलंय.