मुंबई : फेसबुक आता एक नवीन बदल करणार आहे. फेसबुकने टेक्नोलॉजीचे 7 नवे पेटेंटसाठी अर्ज केला आहे. जर हे 7 पेटेंट फेसबुकला मिळतात तर प्रत्येक ठिकाणी त्य़ाची नजर तुमच्य़ावर असेल. तुम्ही घरी बसून काय करता याची माहिती देखील फेसबुक मिळणार आहे. 2012 मध्ये लोकांमध्ये आल्यानंतर फेसबुकने हजारों पेटेंटसाठी अर्ज केले. यापैकी एक आहे फॉरवर्ड-फेसिंग कॅमेरा. यामध्ये फेसबुक तुमचे एक्सप्रेशंस देखील ओळखू शकणार आहे. तुम्ही कोणती न्यूज वाचून बोर होत आहात की तुम्हाला अजून जाणून घेण्य़ाची इच्छा तयार होते आहे हे देखील फेसबुक ओळखू शकणार आहे.
फेसबुकने पहिल्या पेटेंटसाठी अर्ज केले आहे ते म्हणजे तुम्ही कोणत्या रोमँटिक रिलेशनशिप आहात की नाही. या पेटेंटच्या आधारावर फेसबुकला ही माहिती मिळेल की तुम्ही दुसऱ्या युजरच्या प्रोफाईलवर किती वेळा जाता. तुमचे फोटो किती लोकांनी पाहिले आणि त्यामध्ये कोणत्या जेंडरचे लोकं आहेत.
दूसरं पेटेंट आहे ते म्हणजे पोस्ट आणि मॅसेजच्या माध्यमातून हे माहित करणं की तुमचं व्यक्तित्व कसं आहे. तुमचा वाद, मोकळेपणाने बोलणं, तुमच्या भावनांचा वापर आता तुमचा स्वभाव जाणून घेण्यासाठी होणार आहे. त्यानुसार तुम्हाला बातम्या दाखवल्या जातील.
या पेटेंटच्या माध्यमातून पोस्ट आणि मॅसेजचा वापर करुन तुमच्या भविष्याची माहिती जमा केली जाईल. फेसबुक याचा शोध घेईल की, तुमचं क्रेडिट कार्ड ट्रांजॅक्शन कसं आहे. तुमचं लोकेशन काय आहे, तुमच्या आयुष्यात कोणत्या घटना घडल्या. जसं तुमचं शिक्षण, जन्मदिवस आणि इतर गोष्टी.
या पेटेंटने फेसबुक तुमच्या कॅमेऱ्याची ओळख करेल. याने तुमच्या चेहऱ्याचं विश्लेषण केलं जाईल. यासाठी एक युनिक कॅमेरा सिग्नेचर तयार केलं जाईल. तुम्ही कोणत्या फोनमधून फोटो काढता याची देखील माहिती मिळेल. तुम्ही कोणता फोन वापरता यावरुन तुमच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज लावला जाईल. तुम्ही एक फोन किती वेळ वापरता हे देखील फेसबुकला कळणार आहे.
या पेटेंटने तुमचा फोनचा मायक्रोफोनमधून फेसबुक हा शोध लावेल की तुम्ही टीव्हीवर काय पाहत आहात. कोणता शो बघत आहात. तुम्ही जर आवाज बंद केला असेल तरी इलेक्ट्रिकल इंटरफेस पॅटर्नच्या मदतीने हा शोध लावला जाईल की तुम्ही टीव्हीवर काय बघत आहात.
आणखी एक पेटेंट म्हणजे तुमची दिनचर्या. तुम्ही दिवसभर काय करतात याची माहिती फेसबुक ठेवणार आहे. याच्या मदतीने दूसऱ्या यूजर्सला नोटिफिकेशन पाठवून दिनचर्या सुधारण्याची माहिती दिली जाईल. तुम्ही कोठे असतात हे तुमच्या फोनच्या लोकेशनने ट्रॅक केलं जाईल.
या पेटेंटने फोन लोकेशनसह तुमच्या मित्रांचं देखील लोकेशन पाहिलं जाईल. तुम्ही कोणासोबत अधिक वेळ घालवता. तुम्ही किती वेळ झोपता. तुम्ही दिवसातून किती वेळ फोन वापरता आणि त्यावर काय पाहता. याची माहिती फेसबूक ठेवणार आहे.