फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्रामवर मजेशीर फिचर, मेसेज होतील गायब

 फेसुबक मेसेंजर (Facebook Messenger) आणि फोटो शेअरिंग एप इंस्टाग्राम (Instagram)मध्ये देखील हे एप लॉंच

Updated: Nov 16, 2020, 06:43 PM IST
फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्रामवर मजेशीर फिचर, मेसेज होतील गायब title=

नवी दिल्ली : फेसबुक ( Facebook) ने काही दिवसांपुर्वी आपल्या इंस्टंट मेसेंजिग एप व्हॉट्सएपमध्ये (WhatsApp) आपोआप मेसेज डिलीट होणारे फिचर (Vanish Mode) लॉंच केले होते. यासोबतच कंपनीनने नुकतेच आपल्या मेसेंजर प्लॅटफॉर्म फेसुबक मेसेंजर (Facebook Messenger) आणि फोटो शेअरिंग एप इंस्टाग्राम (Instagram)मध्ये देखील हे एप लॉंच केले आहे. 

Facebook Messenger आणि Instagram मध्ये कोणत्याही मित्राला टेक्स्ट, फोटो, वॉईस मेसेज, इमोजी किंवा स्टिकर पाठवू शकता, जे समोरच्याला पोहोचल्यानंतर आपोआप गायब झालाय. याला तुम्ही वेगळ्या चॅटप्रमाणे वापर करु शकता. चॅट विंडो मेसेज वाचल्यानंतर तो मेसेज disappear होईल. लवकरच जगातील इतर देशांमध्ये देखील हे फिचर अपडेट केले जाणार आहे. 

वॅनिश मोड (vanish mode) चॅटच्या खालील स्वाइपसोबत सक्रिय होते. एकदा मेसेज पाठवल्यानंतर बंद करेपर्यंत किंवा एप स्वीचकरेपर्यंत हा मेसेज स्क्रीनवर राहील. मेसेज गायब होण्याआधी तुमच्याकडे स्क्रीनशॉट (Screenshot) काढण्याचा पर्याय असेलच. 

सिक्रेट मेसेज(secret message) फीचर एंड टू एंड एन्क्रिप्टेड (end-to-end encrypted )असेल. हे केवळ तुमच्या पर्सनल डिवाईसमध्ये सेव्ह केलं जाऊ शकतं. 

काही दिवसांपुर्वी फेसबुकने आपले चॅटींग एप व्हॉट्सएप ( WhatsAPP) मध्ये या फिचरची सुरुवात केली. व्हॉट्सएपवर जसा तुमचा मेसेज रिसीव्हरला दिसतो तसा तो आपोआप गायब होतो. भारतातील युजर्सच्या हॅंटसेटमध्ये हे अपडेट येऊ लागला आहे.