मुंबई : फेसबुक कायम आपल्या होम स्क्रिनच्या डिझाइनमध्ये बदल करत असतो. होम स्क्रीनवर फेसबुकवर नुकतेच बदल केले होते. यामुळे
त्यातील नेविगेशन आणि रीडेबिलीटीमध्ये भरपूर बदल झालेले आपल्याला दिसतात. आता झाला हा नवा बदल फक्त एंड्रॉयड युझरसाठी आहे. काही युझर्सच्या अॅपना हे अपडेट मिळाले आहेत. तर काहींना येत्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.
कंपनीने पोस्टवर दिसणाऱ्या कमेंटचा रंग बदलला आहे. त्यामुळे आता युझर्स कोणत्याही कमेंटला रिप्लाय करत असले तर ते अगदी सहज दिसू शकते. कॉमेंट्स आता मॅसेंजर चॅट थ्रेडप्रमाणे दिसणार आहे. टायपिंग बॉक्स देखील फेसबुक मॅसेंजर प्रमाणे दिसत आहे. अगदी सहज हे वाचता यावे यासाठी कंपनीने याचा रंग कॉन्स्ट्रास्टमध्ये दिला आहे. तसेच लिंक प्रिव्ह्यूला मोठं करण्यात आलं आहे. तसेच लाइक, कॉमेंट आणि शेअर बटणाला थोडे मोठे करण्यात आले आहे. तसेच कॉमेंट आणि न्यूज फीडमध्ये दिसणारे फोटो देखील स्केअर शेपमध्ये देण्यात आले आहे.
आता युझर्सना हे बघणं अतिशय सोपं जाईल की, त्यांनी क्लिक केलेली लिंक कुठे उघडेल आणि कुणाच्या पोस्टवर कमेंट जात आहे. तसेच आता कोणतीही पोस्ट वाचणे आणि त्यातून लवकर बाहेर येणं हे अगदी सहज सोपं आहे. फेसबुकची फोटो शेअरिंग पोर्स्टल इंस्टाग्राममध्ये देखील काही बदल केले आहे. टीमने कॉन्वर्जेशन सेक्शनमध्ये काही बदल केले आहे ज्यामुळे कॉमेंट करणं अतिशय सोपं होऊ शकतं.
संबंधित ब्लॉग पोस्टमध्ये लिहिला असेल,कॉमेंट थ्रेडमधून तुमची नजर कॉन्वर्जेशन राहावी तसेच खास गोष्टीला उत्तर देणं सहज सोपं होईल याकरता ही सोय केली आहे. इंस्टाग्रामचं म्हणणं आहे की, हा बदल अॅपच्या २४ व्या वर्जनमध्ये करण्यात येत आहे.