तुम्हालाही आलाय का Electricity Bill भरण्यासाठी 'हा' मेसेज? चुकूनही त्यावर क्लिक करू नका

भारतात सायबर क्राईमच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. NCRB च्या अहवालानुसार भारतात ऑनलाइन बँकिंग (Online banking) फसवणुकीची 4,047 प्रकरणे, ATM फसवणुकीची 2,160 प्रकरणे, क्रेडिट किंवा डेबिट कार्डची 1,194 प्रकरणे आणि OTP फसवणूकीची 1,093 प्रकरणे समोर आली आहेत. असे असताना देशात आणखी एक नवा घोटाळा (scam) समोर आला आहे. (electricity bill scam scammers send a message then empty bank account)  

Updated: Sep 13, 2022, 11:34 AM IST
 तुम्हालाही आलाय का Electricity Bill भरण्यासाठी 'हा' मेसेज? चुकूनही त्यावर क्लिक करू नका title=

cyber crime : भारतात सायबर क्राईमच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. NCRB च्या अहवालानुसार भारतात ऑनलाइन बँकिंग (Online banking) फसवणुकीची 4,047 प्रकरणे, ATM फसवणुकीची 2,160 प्रकरणे, क्रेडिट किंवा डेबिट कार्डची 1,194 प्रकरणे आणि OTP फसवणूकीची 1,093 प्रकरणे समोर आली आहेत. असे असताना देशात आणखी एक नवा घोटाळा (scam) समोर आला आहे. (electricity bill scam scammers send a message then empty bank account)  

या घोटाळ्यात फसवणूक करणारे लोक SMS द्वारे वीज बिल जमा करण्यासाठी लिंक पाठवतात. मेसेजमध्ये वीज बिल (Electricity Bill) जमा करण्याची लिंकही देण्यात आली आहे. या लिंकवर (Link) क्लिक केल्यावर युजर्सच्या बँक खात्यातून पैसे कापले जातात.

वीज बिलाचा (Electricity Bill) हा घोटाळा (scam) नवीन नाही. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. स्कॅमर वापरकर्त्याचे बँक (bank) खाते रिकामे करतात. SMS व्यतिरिक्त, स्कॅमर व्हॉट्सअॅपवर असे sms पाठवतात. यामुळे, तुम्ही अशा स्कॅम मेसेजपासून सावध राहणे आवश्यक आहे.

वीज खंडीत करण्याची धमकी

अनेक लोक वीज बिल (Electricity Bill) भरण्यासाठी ऑनलाईन पेमेंट प्रणालीचा वापर करतात. हेच ओळखून ऑनलाईन बँकिंग वापरणाऱ्यांना लुटण्यासाठी सायबर भामट्यांनी नवाच फंडा शोधून काढला आहे. राञी झोपण्याच्यावेळी ते ग्राहकांच्या मोबाइलवर कॉल करतात आणि सांगतात की, “तुमचं लाईट भरलेलं नाही. पुढच्या तासाभरात तुमचं लाईट कनेक्शन कट होणार आहे आणि ते टाळायचं असेल तर आम्ही तुमच्या मोबाइलवर पाठवत असलेल्या ऑनलाइन लिंकवर जाऊन तात्काळ बील भरा.” 

राञीच्या वेळी घरातली लाईट कट होऊ म्हणून ग्राहकही सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अलगद फसतात आणि सायबर गुन्हेगारांकडून त्यांची आर्थिक फसवणूक होते.

वाचा : सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब, अन्नधान्याच्या किंमती वाढल्या

असे सुरक्षित रहा

- महावितरणकडून केवळ नोदणीकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे एसएमएस पाठवले जातात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा MSEDCL (उदा. VM- MSEDCL, VK- MSEDCL) असा असतो. त्यामुळं याशिवाय कोणत्याही वैयक्तिक क्रमांकावरून आलेल्या एसएमएसला प्रतिसाद देऊ नये.
- वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून आलेल्या बनावट एसएमएसना प्रतिसाद देऊ नये, तसेच यावरील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.
- महावितरण MSEDCL शिवाय कोणतंही एप डाउनलोड करायला सांगत नाही. त्यामुळं वीज बिल भरण्यासाठी लिंक किंवा कोणतंही सॉफ्टवेअर डाउनलोड करू नये.
- वीज बिल भरण्यासाठी महावितरणकडून कोणत्याही प्रकारचा कॉल केला जात नाही, त्यामुळं अशा फेक कॉलला बळी पडू नये.
- Any Desk , team viewer, Quick support सारखे App डाउनलोड करू नये. कारण त्यामार्फत सायबर गुन्हेगार तुमची माहिती आणि डेटा चोरू शकतात.