गाडीची बॅटरी चार्जिंग करण्याची कटकट मिटणार, आता रस्ताच करणार गाडी चार्ज; कसं ते पाहा

इलेक्ट्रिक गाड्या आल्यानंतर तुम्हाला चार्ज करण्यासाठी देखील थांबावं लागणार नाही. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असलं तरी भविष्यात ही गोष्ट शक्य होणार आहे.

Updated: Feb 14, 2022, 10:11 PM IST
गाडीची बॅटरी चार्जिंग करण्याची कटकट मिटणार, आता रस्ताच करणार गाडी चार्ज; कसं ते पाहा title=

मुंबई : सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे लोकांचं आर्थिक व्यवहार कोलमडू लागलं आहे. ज्यामुळे लोकं आता पर्यायी मार्गांकडे वळले आहेत. लोक आता सीएनजी गाड्या तसेच, इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळले आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांकडे आता फ्युचन म्हणून देखील पाहिले जाते. कारण भविष्यात याच गाड्यंची मागणी वाढणार आहे. गाडी चालण्यासाठी इंधनाची अवशकता असते. विना इंधन गाडी चालत राहाणं हे शक्य नाही हे सर्वांनाच माहित आहे.

इंधन संपू लगलं की आपल्याला ते गाडीत भरावं लागतं. तसेच सेम इलेक्ट्रिक गाड्यांचं आहे. एका विशिष्ट वेळेनंतर गाड्यांमधील चार्जींग संपतं, ज्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांची बॅट्री वेळोवेळी चार्ज करावी लागते.

परंतु तुम्हाला सांगितलं की आता भविष्यात इलेक्ट्रिक गाड्या आल्यानंतर तुम्हाला चार्ज करण्यासाठी देखील थांबावं लागणार नाही. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असलं, तरी ही गोष्ट शक्य होणार आहे.

अमेरिकेच्या इंडियाना डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशननं हा प्रयोग हाती घेतलाय. पर्ड्यू विद्यापीठाच्या सहकार्यानं जगातला पहिला वायरलेस चार्जिंग काँक्रिट फुटपाथ हायवे तयार होणार आहे. अत्याधुनिक मॅग्नेटायझेबल काँक्रिटचा उपयोग रस्ता बांधण्यासाठी केला जाईल.

जर्मन स्टार्टअप मॅगमेंटनं हे काँक्रिट विकसित केलंय. वाहनं वायरलेस पद्धतीनं चार्ज करण्याची या काँक्रिटमध्ये क्षमता आहे. यापासून तयार झालेल्या रस्त्यांवरून जाताना ई कार आपोआप रीचार्ज होतील.

हा प्रयोग यशस्वी झाल्यास मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेसह अनेक महत्त्वाचे रस्ते हे असे इलेक्ट्रिक रोड करता येऊ शकतील.

देशात ई कारचा वापर वाढावा यासाठी सरकारनं बॅटरी स्वॅपिंग धोरण जाहीर केलंय. चार्जिंग करणारे रस्ते हा त्याचा पुढला टप्पा ठरू शकतो. पेट्रोल-डिझेल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना ई व्हेईकल आणि ई रोड गेमचेंजर ठरू शकतात.