इलेक्ट्रिक कार Kia EV6 बाजारात येण्याआधीच फोटो प्रसिद्ध, शानदार डिझाइन

 Kia Corporation ने प्रसिद्ध केलेल्या या फोटोंमध्ये प्रथमच या इलेक्ट्रिक कारच्या बाहेरील आणि अंतर्गत डिझाइनचा लूक आला आहेत.

Updated: Mar 15, 2021, 10:36 PM IST
इलेक्ट्रिक कार Kia EV6 बाजारात येण्याआधीच फोटो प्रसिद्ध, शानदार डिझाइन title=

मुंबई : KIA या कंपनीची पूर्णपणे इलेक्ट्रिक असलेली Kia EV6 ही कार या महिन्याच्या शेवटी बाजारात आणली जाणार आहे. पण ही कार बाजारात येण्यापूर्वीच तिचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. Kia Corporation ने प्रसिद्ध केलेल्या या फोटोंमध्ये प्रथमच या इलेक्ट्रिक कारच्या बाहेरील आणि अंतर्गत डिझाइनचा लूक आला आहेत. दक्षिण कोरियन कार निर्माता एका मोठ्या ऑनलाइन इव्हेंटमध्ये या कारचं प्रीमियर करणार आहे.

नवीन इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लेटफॉर्मवर बनवली आहे. कार (The car is built on the new electric-global modular platform)
EV6 बॅटरी इलेक्ट्रीक वाहनांसाठी विकसित केलेल्या नवीन इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (ई-जीएमपी) पासून बनलेली आहे.

Kia EV6 मध्ये नोज ग्रिल, स्लीक डे टाइम रनिंग लाइट्स (DRL's) आणि अत्यंत आकर्षक हेडलॅम्प्ससह, डायनॅमिक पॅटर्न एअर इंटेक देखील आहे. कारच्या बाजूला दिलेल्या स्वेप्ट बॅक विंडशील्ड आणि कॅरेक्टर लाईन्स या गाडीला एक चांगला लूक देतात.

कारमध्ये मिळणार खूप काही (You will get a lot in the car)

कारमध्ये, आपल्याला एक मोठी ऑडिओ व्हिज्युअल नेव्हिगेशन (AVN) सिस्टम मिळेल. जी स्टीयरिंग व्हीलद्वारे संपूर्ण सेंटर डॅशबोर्डला व्यापते. हे संपूर्ण युनिट इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इन्फोटेनमेंट सिस्टम, नेव्हिगेशन डिटेलला समोर डिस्प्ले करते. तसेच, कारमध्ये प्रवासी नियंत्रण, हीटिंग, वेंटिलेशन आणि वातानुकूलीत सेटिंग्ज आहेत.
सीट आणि फॅब्रिक कारची सुंदरता आणखी वाढवते.

500 किलोमीटर पर्यंत ड्राइविंग रेंज (Driving range up to 500 km)

Kia ची ही नवीन इलेक्ट्रिक कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 500 किमी पर्यंतचा प्रवास करते. तसेच यात E-GMP प्लॅटफॉर्म वापरला गेला आहे, ज्यामुळे कार 18 मिनिटांत 80 टक्के पर्यंत चार्ज होऊ शकते. याची बॅटरी 72.6 kWh  क्षमतेची आहे.