50 तासांचा प्लेबॅक टाइम; प्रदूषित हवाही करणार स्वच्छ, Dyson ने लाँच केला जबरदस्त हेडफोन, किंमत किती?

Dyson ने आपला नवा हेडफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. कंपनीचा हा डिटॅचेबल एअर प्युरिफायर हेडफोन याआधीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 5, 2023, 03:22 PM IST
50 तासांचा प्लेबॅक टाइम; प्रदूषित हवाही करणार स्वच्छ, Dyson ने लाँच केला जबरदस्त हेडफोन, किंमत किती? title=

Dyson कंपनी सर्वोत्तम एअर प्युरिफायर आणि इतर घराच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी ओळखली जाते. दरम्यान कंपनी आता इतर सेगमेंटमध्येही आपले नवे प्रोडक्ट्स लाँच करत आहे. नुकतंच कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपले Dyson Zone नॉइस-कॅन्सलिंग हेडफोन लाँच केले आहेत. या हेडफोनमधून युजर्सना आतापर्यंत कधीही न मिळालेला अनुभव मिळणार असल्याचा दावा कंपनी करत आहे. 

या हेडफोनच्या फिचर्सबद्दल बोलायचं गेल्यास यामध्ये सलग 50 तासांचा प्लेबॅक टाइम मिळणार आहे. यामध्ये अॅडव्हान्स नॉइन कॅन्सलेशन आणि चांगलं ऑडिओ आऊटपूट मिळणार आहे. या हेडफोनसह एक डिटॅचेब वायजरही मिळतो, जो हवा स्वच्छ करण्यात मदत करतो. 

Dyson Zone ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने हा हेडफोन Dyson Zone आणि Dyson Zone Absolute+ या दोन व्हेरियंट्समध्ये लाँच केला आहे. याचे बेस व्हेरियंट अल्ट्रा ब्लू आणि पर्शियन ब्लू अशा दोन रंगात उपलब्ध आहे. Absolute+ एडिशन तुम्ही ब्राइट कॉपर आणि पर्शियन ब्लूमध्ये खरेदी करू शकता. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Dyson.in आणि Dyson Demo स्टोअरवरून हे हेडफोन खरेदी करु शकता.

या हेडफोनची किंमत 59 हजारांपासून सुरु होते. तर Absolute+ व्हेरियंटची किंमत 64,900 रुपये आहे. यासह कंपनीने इलेक्ट्रो स्टॅटिक कार्बन फिल्टर, वायजर क्लिनिंग ब्रश, युएसबी-सी चार्जिंग केबल आणि वाइजर स्लिव्ह्स मिळतात. 

खास फिचर्स

Dyson Zone लिथियम-आयर्न बॅटरी आणि USB टाइप-सी चार्जिंग सिस्टमसह येतो. कंपनीचा दावा आहे की यामधअये 50 तासांसाठी अल्ट्रा लो डिस्टॉर्शन साऊंड मिळणार आहे. हा हेडफोन पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 3 तास लागतील.

यामध्ये 11 मायक्रोफोन्सचा वापर करण्यात आला असून त्यापैकी 8 मायक्रोफोन्सचा वापर आजूबाजूचा आवाज कमी करण्यासाठी करण्यात आला आहे. हेडफोन्सचे कम्फर्ट पॅड कोणत्याही आकाराच्या कानाला सहज जुळवून घेतील असा कंपनीचा दावा आहे.

यामध्ये पारदर्शक मोड देखील देण्यात आला आहे, ज्याचा वापर करून तुम्ही आवाज कमी करू शकता. हेडफोनमध्ये अतिरिक्त मायक्रोफोन प्रदान केला आहे, जो कॉलिंग, रेकॉर्डिंग किंवा व्हॉइस कंट्रोलसाठी वापरला जाऊ शकतो.