मुंबई : कोरोनाच्या काळात बँकिंग फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये बरीच तेजी आली आहे. या महामारीमुळे लोक डिजिटल जगात पोहोचले आहेत. ज्यामुळे जवळ जवळ सगळीचं कामं सोपी झालं आहे. जिथे आधी कोणतेही काम करण्यासाठी तासन तास रांग लावून उभं रहावं लागतं होतं, ती कामं देखील आता या डिजिटल सोयीमुळे आता घरबसल्या आणि काही वेळातच पूर्ण केली जात आहेत. ज्यामुळे लोकांना देखील ही पद्धत आवडायला लागली आहे आणि जास्तीत जास्त लोकं याचा वापर करायला लागली आहेत.
परंतु प्रत्येक गोष्टींच्या दोन बाजू असताता, त्या आपण लक्षात घेणे गरजेचं आहे. यासगळ्यामुळे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी बँका आपल्या ग्राहकांना वेळोवेळी आवाहन करत असतात.
देशातील सर्वात मोठी बँक SBI ने देखील आपल्या ग्राहकांना यासंदर्भात अलर्ट जारी केलं आहे. यामध्ये बँकेने ग्राहकांना त्यांच्या फोनवर सर्वप्रकारचे अॅप्स डाउनलोड करणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
एसबीआयने ट्विट केले की, तुमची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. म्हणून, तुमच्या वैयक्तिक/आर्थिक तपशीलांचे संरक्षण करण्यासाठी, केवळ प्रमाणित स्त्रोतांकडून अॅप डाउनलोड करा. अज्ञात व्यक्तींच्या सांगण्यावरून कोणतेही अॅप डाउनलोड करू नका. बँकेचे म्हणणे आहे की, जर तुम्ही असे केले तर अशी शक्यता आहे की, अज्ञात व्यक्ती तुमचे बँकिंग तपशील वाचू शकते.
त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने मेसेजमध्ये एखादी लिंक पाठवली तर ती उघडू नका.
कारण याच्या माध्यमातून हे हॅकर्स, तुमचे बँकिंक डिटेल्स तर हॅक करतीलच शिवाय ते तुमचा OTP पाहण्यासाठी देखील सक्षम असली. त्यानंतर ते कोणत्याही प्रकारचे व्यवहार तुमच्या खात्यातुन करु शकतात. ज्यामुळे बँकेने आपल्या ग्राहकांना सावध आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
लोकांच्या खात्यांवर फिशिंग आणि इतर युक्त्यांसह अनेक मार्गांनी हल्ला केले जाते. याच्या मदतीने कोणीही तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती लीक करू शकते आणि तुमचे नुकसान करू शकते.
अलीकडे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकल सर्कल द्वारे एक सर्वेक्षण आयोजित केले गेले होते, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, बरेच वापरकर्ते सुरक्षा पद्धतींचे पालन करत नाहीत आणि त्यांची वैयक्तिक माहिती असुरक्षित पद्धतीने ठेवतात.
सर्वेक्षणात 24 हजार लोकांचे मत घेण्यात आले, ज्यामध्ये 29 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी त्यांचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि एटीएम पिन कुटुंबातील एक किंवा अधिक सदस्यांसोबत शेअर केले आहेत. त्याच वेळी, 4 टक्के लोकांनी ते घरगुती कर्मचाऱ्यांना दिले, त्यात 65 टक्के लोक होते ज्यांनी त्यांची वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर केली नाही.