चुकूनही ON नका करू हे फीचर्स, बंद होईल तुमचा स्मार्टफोन

स्मार्टफोनमध्ये हल्ली इतके फिचर्स आलेत की अधिक गोष्टी तर आपल्याला माहितही नसतात. मात्र 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 1, 2017, 10:58 AM IST
चुकूनही ON नका करू हे फीचर्स, बंद होईल तुमचा स्मार्टफोन  title=

मुंबई : स्मार्टफोनमध्ये हल्ली इतके फिचर्स आलेत की अधिक गोष्टी तर आपल्याला माहितही नसतात. मात्र 

आपण कधी कधी सर्रास सगळे फिचर्स ऑन ठेवतो किंवा ते होम स्क्रिनवर आणतो. पण हे करण्यापूर्वी नक्की विचार करा. आम्ही तुमच्याशी आज काही फिचर्स आणि टिप्स शेअर करणार आहोत. जे तुम्हाला स्मार्टफोन वापरायला अधिक मदत करेल. आज आम्ही तुम्हाला फोनची ती सेटिंग सांगणार आहोत जी तुम्ही कधीच ON करायची नसते. मात्र कोणतीही मोबाईल कंपनी हे सांगत नाही. कारण याने तुम्हाला नुकसानच होणार असते. 

जर तुम्ही या स्मार्टफोनमधल्या सेटिंगला ऑन केलं तर तुमचा फोन चुकीच्या पद्धतीने वागू लागेल. अनेकदा युझर्स स्मार्टफोन वापरण्याच्या नादात सर्व फिचर्स ऑन करतो आणि मग त्याला त्याचा त्रास होऊ लागल्यावर मोबाइल कंपन्यांकडे चक्कर मारत राहतो. 

ही आहे ती सेटिंग जी कधीच ON करू नका 

स्मार्टफोनच्या Setting मध्ये जाऊन Accessebility मध्ये जा. इथे तुम्हाला Tall Back चे ऑप्शन दिसेल. या ऑप्शनला कधीच ON करू नका. कारण ही सेटिंग अंध आणि लो व्हिजन युझर्ससाठी तयार करण्यात आले आहे. यानंतर तुमचा फोन तुमच्या बोलण्यावर आणि टच करण्यावर रिस्पॉन्स करू लागतो. आणि तुम्हाला याची माहिती नसल्यामुळे नेमकं काय घडतंय हे तुम्हाला कळत नाही. आणि जर तुम्ही ही सेटिंग ऑन केली तर तुम्हाला ते ऑफ करणं कठिण होतं. ऑफ करण्यासाठी ग्रीन आऊट लाइन येण्या अगोदरच हे स्विच ऑफ करणं गरजेचं आहे 

डेटा आणि बॅटरी वाचवणारी सेटिंग 

फेसबुक अॅप मोबाईलच्या बॅकग्राऊंट प्रोसेसिंगमध्ये करत असते. ज्यामध्ये फोनची बॅटरी सर्वाधिक खर्च होते. बॅटरी आणि डेटा वाचवण्यासाठी फेसबुक प्रोफाईलला ओपन करा. तिथे तुम्हाला ३ लाईन दिसेल तिथे क्लिक करा. डेटा सेव्हरचे ऑप्शन दिसेल तिथे ऑन करा. 

बॅटरी वाचवण्यासाठी नेमकं काय कराल 

सेटिंगमध्ये जाऊन डेव्हलपर ऑप्शनला ऑफ करा. याचा वापर जास्त युझर्स करत नाहीत. याला ऑन केल्यामुळे फोनमध्ये इंचरनल प्रोसेसिंग सुरू असते. आणि त्यामुळे बॅटरी लो होते. फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन वाय-फाय ऑप्शनवर टॅप करा. वाय फायच्या सेटिंगमध्ये जाऊन Kepp वाय फाय ऑन during sleep ऑप्शनला never करा. यामुळे देखील बॅटरी आणि डाटा वाचू शकतो.