मुंबई : तुम्हाला तुमच्या आजूबाजूला क्वचितच असा व्यक्ती दिसेल, ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही. कारण सध्या स्मार्टफोन ही काळीची गरज आहे. आपण प्रत्येक छोटया कामापासून ते मोठ्या कामापर्यंत स्मार्टफोनवर अवलंबून असतो. ज्यासाठी बाजारात वेगवेगळे ऍप्स देखील उपलब्ध आहेत. ज्याला डाऊनलोड करुन आपण वेगवेगळं काम करु शकतो. परंतु अशावेळी केलेली तुमची एक चुक तुम्हाला भलतीच महागात पडू शकते.
तुम्ही स्मार्टफोन यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा ऍपबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या फोनवर कधीही डाउनलोड करू नका.
चला तर जाणून घेऊ या की, असा कोणता ऍप आहेत, जे आपल्याला चुकूनही डाउनलोड न करण्यासाठी सांगितलं गेलं आहे.
यामध्ये HeyMods डेव्हलपर्सच्या Hey WhatsApp चा उल्लेख केला जात आहे. या अॅपवर असे अनेक नवीन फीचर्स आहेत जे व्हॉट्सऍपवर वापरता येतील. या फीचर्सच्या लालसेपोटी यूजर्स हे ऍप डाऊनलोड करत आहेत आणि आपली माहिती त्यांना देत आहेत. हे चॅटिंग ऍप बनावट आहे आणि तुम्ही ते डाउनलोड करू नये. तसेच या ऍपमध्ये WhatsApp प्रमाणे End-to-End Encryption देखील दाखवलं जात नाही.
हेच कारण आहे की, याद्वारे हॅकर्स क्षणार्धात तुमच्या चॅट्स आणि इतर महत्त्वाचा डेटा चोरू शकतात आणि तुमच्या तपशीलांमध्ये प्रवेश करू शकतात. हे ऍप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले नाही परंतु ते असत्यापित स्त्रोतांकडून डाउनलोड केले जात आहे.
व्हॉट्सऍपच्या सीईओने ट्विटरवर म्हटले आहे की व्हॉट्सऍप अशा ऍप्सला ब्लॉक करण्याचा प्रयत्न करत राहील, परंतु वापरकर्त्यांनी देखील सावधगिरी बाळगली पाहिजे कारण असे अॅप्स डाउनलोड करणे खूप धोकादायक ठरू शकते.