Flipkart आणि Amazon पेक्षा निम्म्या किंमतीत वस्तू विकतायत 'या' वेबसाइट, ग्राहक करतायेत तुफान खरेदी....

Online Shopping  : जर तुम्हाला कमी किमतीत फॅन्सी वस्तू खरेदी करायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी अशा वेबसाइट्स आणल्या आहेत ज्या तुमच्या वस्तू जवळपास घाऊक किमतीत विकतात. 

Updated: Sep 16, 2022, 09:55 AM IST
Flipkart आणि Amazon पेक्षा निम्म्या किंमतीत वस्तू विकतायत 'या' वेबसाइट, ग्राहक करतायेत तुफान खरेदी....   title=

Cheapest Shopping Online: आजकाल लोकांना ऑफलाईन शॉपिंग (Offline Shopping) पेक्षा ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) जास्त आवडते. त्यामागचे कारण म्हणजे इथे वस्तूंची किंमत खूप कमी असते. तसेच ग्राहकांना खरेदी करण्यासाठी कुठेही जावे लागत नाही. घर बसल्या वस्तू विकत घेऊ शकतो. जरी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सर्वात स्वस्त ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून खरेदी करत आहात तर हा तुमचा गैरसमज ठरू शकतो.

कारण आज आम्ही तुमच्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून घेऊन आलो आहोत.. जिथे जवळपास घाऊक किंमतीत वस्तू विकल्या जातात. आणि त्यांचा दर्जा इतका उत्तम आहे की त्यांच्यासमोर महागड्या वस्तूही कमी दिसतात. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही वेबसाईट आणि काय आहे त्यांची खासियत.

Meesho

सध्या Meesho या Shooping वेबसाईटवर users ची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामागचे कारण त्यांच्या उत्पादनांची परवडणारी किंमत आहे. ती इतकी कमी आहे की कोणतीही वेबसाइट (website) त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही. जर तुम्हाला कपड्यांपासून घरगुती वस्तू किंवा अॅक्सेसरीज स्वस्त दरात खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला यापेक्षा चांगली वेबसाइट क्वचितच सापडेल. बाजारात जी वस्तू ₹ 500 ते ₹ 600 च्या दरम्यान विकली जात आहे, ती Meesho कडून ग्राहक ₹ 200 ते ₹ 300 मध्ये खरेदी करू शकतात. या वेबसाइटवर अशी काही उत्पादने आहेत ज्यांची किंमत इतकी कमी आहे की तुम्हाला वाटेल की तुम्ही ते घाऊक किंमतीत खरेदी करत आहात.

वाचा : Bank ने खातेदारकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे

Shopee

या वेबसाइटवर ग्राहक ₹ 500 मध्ये इतकी उत्पादने खरेदी करू शकतात की तुम्ही इतर कोणत्याही वेबसाइटवर (website) खरेदी करू शकत नाही. वास्तविक, येथे विकल्या जाणार्‍या उत्पादनांची किंमत बाजारात पाठवलेल्या उत्पादनांपेक्षा कमी आहे. एवढेच नाही तर कंपनी तुम्हाला मोफत होम डिलिव्हरी देखील देते आणि त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क देखील आकारले जात नाही. येथे कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू निम्म्याहून कमी किमतीत दिल्या जातात. इतक्या किफायतशीर किमतीत एखादे उत्पादन खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, त्यामुळे तुम्ही अजूनही Flipkart आणि Amazon वरून खरेदी करत असाल, तर तुम्ही हे प्लॅटफॉर्म वापरून पहा.