फोन किंवा कॉम्प्युटरमध्ये सीसी क्लीनर असल्यास तुम्हाला आहे 'हा' धोका !

कॅशे, जंक फाईल्स, व्हायरस डिलीट करण्यासाठी अधिकतर लोकांच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये सी क्लीनर अॅप किंवा सॉफ्टवेअर असते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 19, 2017, 04:25 PM IST
फोन किंवा कॉम्प्युटरमध्ये सीसी क्लीनर असल्यास तुम्हाला आहे 'हा' धोका ! title=

नवी दिल्ली :  कॅशे, जंक फाईल्स, व्हायरस डिलीट करण्यासाठी अधिकतर लोकांच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये सी क्लीनर अॅप किंवा सॉफ्टवेअर असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन मोबाईल किंवा पीसीमधून डेटा चोरला जातो. हॅकर्स सी क्लीनर सॉफ्टवेअरची सिक्युरिटी सिस्टीम मोडून त्यात मलवेअर इंजेक्ट करतात. याचा धोका आत्तापर्यंत २० लाख लोकांना पोहचला आहे. 

सी क्लीनरची सिक्युरिटी सिस्टीम आणि अँटी व्हायरस सॉफ्टवेअर हा A vast चा भाग आहे. सिस्को सिक्युरिटी टीमच्या म्हणण्यानुसार, सी क्लीनर व्हर्जन ५.३३ मध्ये मल्टी स्टेज्ड मलवेअर पेलोड असल्यामुळे ते इन्स्टॉल करताच सिस्टममध्ये प्रवेश करतात. 

सी क्लीनर साधारणपणे २ कोटी लोकांनी डाऊनलोड केले होते. याचा वापर जगभरात होत आहे. भारतात देखील हे अॅप बरेच लोकप्रिय आहे. त्यामुळेच सी क्लीनर अॅप हे हॅकर्सचे माध्यम झाले आहे. त्यामुळे हॅकर्स तुमच्या सिस्टीमचा आयपी अॅड्रेस, नेटवर्क, क्रेडीट कार्डची माहिती आणि पासवर्ड चोरी करू शकतात. 

A vast Pirifrom च्या नुसार मलवेअरमुळे साधारण २० लाखाहून अधिक कॉम्प्युटर प्रभावित झाले आहेत. त्यापैकी अधिकतर कॉम्प्युटर ३२ बिटचे आहेत. सिस्टीममध्ये सी क्लिनरचे ५.३३.६१६२ व्हर्जन असल्यास ही समस्या उद्भवू शकते. सी क्लिनर १२ डिसेंबरनंतर अपडेट केले असल्यास तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. सी क्लीनरचे हे व्हर्जन फक्त कॉम्प्युटरसाठी उपलब्ध असल्याने अॅनरॉईड युजर्सना कोणताही धोका नाही.