बीएसएनएलचा नवा प्लॅन - मोफत कॉलिंग आणि १ जीबी डेटा मिळणार

रिलायन्सचया जियोला टक्कर देण्यासाठी सार्‍याच टेलिकॉम कंपन्या अधिक आकर्षक प्लॅन चा विचार करत आहेत. 

Updated: Sep 6, 2017, 12:46 PM IST
बीएसएनएलचा नवा प्लॅन - मोफत कॉलिंग आणि १ जीबी डेटा मिळणार  title=

नवी दिल्ली : रिलायन्स जियोला टक्कर देण्यासाठी सार्‍याच टेलिकॉम कंपन्या अधिक आकर्षक प्लॅन चा विचार करत आहेत. एअरटेल,आयडिया,व्होडाफोननंतर आता बीएसएनएलने ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त आणि मस्त प्लॅन बाजारात आणला आहे. बीएसएनएलच्या नव्या प्लॅननुसार, ग्राहकांना ९० दिवसांसाठी अनलिमेटेड कॉलिंग आणि प्रतिदिन १ जीबी डेटा मिळणार आहे. मंगळवारी बीएसएनएलने या ऑफरची घोषणा केली आहे. 

कसा आहे हा प्लॅन ? 

बीएसएनएलचा हा नवा प्लॅन केरळ वगळता इतर कोणत्याही नेटवर्कमध्ये मोफत लोकल आणि एसटीडी कॉल देणार आहे.
९० दिवस नियमित १ जीबी डेटा दिला जाईल. 
हा प्लॅन ग्राहकांना ९० दिवसांसाठी  ४२९  रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे  महिन्याला साधारणपणे १४३ रूपये खर्च होतील.  

 टेलिकॉम क्षेत्रातील बडी कंपनी एअरटेलने नुकताच १४९ रूपयांचा नवा प्लॅन लॉन्च केला आहे. यानुसार ग्राहकांना २८ दिवसांसाठी एअरटेल टू एअरटेल अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. सोबतच नियमित  २ जीबी डेटा मिळेल. एअरटेलनंतर बीएसएनएलचा हा नवा प्लॅन सर्वात आकर्षक असल्याचे मानले जात आहे.