मुंबई : 'होंडा' कंपनीची Grom 125 ही बाईक लवकरच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. 125 सीसी इंजिन क्षमता आणि स्पोर्टी लूक असलेल्या या बाईकची तरुणांमध्ये उत्सुकता दिसून येतेय.
होंडाच्या 'नवी' या बाईकला ग्राहकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. आता, जवळपास याच बाईकसारखी स्टाईल असणाऱ्या बाईकची सध्या टेस्टिंग सुरू आहे. भारतात 'ऑटो एक्सपो 2018' मध्ये ही बाईक लॉन्च होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात ही बाईक SOHC 4 सिंगल सिलिंडर स्ट्रोक इंजिन सोबत उपलब्ध आहे. यामध्ये 4 स्पीड गिअरबॉक्स दिला गेलाय. 9.7 बीएचपी पॉवर आणि 10.9 न्यूटन मीटरचा टॉर्क या बाईकमध्ये जनरेट होतो.
ब्रेक सिस्टममध्ये पुढे 220 एमएम डिस्क ब्रेक आहे यामध्ये हायड्रॉलिक ड्युएल पिस्ट कॅलिपर दिला गेलाय. तर रिअर व्हिलमध्ये 190 एमएम डिस्क ब्रेक दिला गेलाय.
मंकी मिनी बाईकचं हे अपडेटेड रुप आहे. या बाईकच्या किंमतीबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. परंतु, याचा लूक आणि फिचर्स पाहून ही बाईक तरुणांच्या पसंतीस उतरु शकते, असं म्हटलं जातंय.