Jio - Airtel चे धाबे दणाणले; देशात लवकरच लॉंच होणार BSNL ची 4G सेवा

BSNLने भारतात आपली 4 G सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. 2022च्या स्वातंत्र्य दिनाआधी कंपनी ही सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. बीएसएनएल पूर्ण देशात 1 लाख टेलिकॉम टॉवर लावणार आहे. एकट्या बिहारमध्ये 40 हजार टॉवर लावण्यात येणार आहे.

Updated: Feb 22, 2022, 02:01 PM IST
Jio - Airtel चे धाबे दणाणले; देशात लवकरच लॉंच होणार BSNL ची 4G सेवा title=

मुंबई : रिलायन्स जीओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडीयाने प्रीपेडचे प्लॅन्स महाग केले आहेत. तसेच दुसरीकडे बीएसएनएल या परिस्थितीचा फायदा घेत, ग्राहकांना माफक शुल्कात अधिक सेवा देत आहे. डिसेंबर महिन्यात BSNLशी 11 लाख नवीन ग्राहक जोडले गेले आहेत. तसेच जीओचे देखील बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. BSNLने टाटा कंसल्टंन्सी सर्विसेससोबत पार्टर्नरशिप केली आहे. बीएसएनएल अखेर देशात चौथ्या जनरेशनची सेवा लॉंच करणार आहे.

स्वातंत्र्यता दिवसाआधी BSNLची 4जी सेवा

नवीन रिपोर्ट्सनुसार, बीएसएनएलच्या 4 जी सेवेची लॉंचिंग 15 ऑगस्टच्या आसपास होऊ शकते. सध्या बीएसएनएल ग्राहकांना 3जी सेवा प्रदान करते.

गेल्या अनेक वर्षांपासून एअरटेल, वीआय आणि जिओ या खासगी कंपन्या 4 जी सेवा देत आहेत. पुढच्या वर्षावर्षी 5 जी सेवा देखील येण्याची शक्यता आहे. 

परंतू बीएसएनएल नेहमीच माफक शुल्कात आपल्या सेवा प्रदान करीत असते. त्यामुळे बीएसएनएलची 4 जी सेवा सुरू झाल्यास खासगी कंपन्यांचं टेन्शन वाढणार आहे.