एक रुपयाही न देता Mahindra Scorpio-N खरेदी करा, जाणून घ्या नव्या स्किमबद्दल

कमी बजेटमुळे तुम्ही अजून गाडी बुक केली नसेल, तर तुमच्यासाठी कंपनीनं एक आकर्षक फायनान्स स्कीम आणली आहे.

Updated: Aug 1, 2022, 05:56 PM IST
एक रुपयाही न देता  Mahindra Scorpio-N खरेदी करा, जाणून घ्या नव्या स्किमबद्दल title=

Mahindra Scorpio-N Finance Scheme:  महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने नुकतीच Scorpio-N SUV भारतात लाँच केली आहे. या गाडीबाबत कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत रु. 11.99 लाख, एक्स-शोरूम आहे. मात्र, ही किंमत सुरुवातीच्या 25 हजार बुकिंगसाठी होती. त्यानंतरच्या बुकिंगच्या किमती अजून जाहीर केलेल्या नाहीत. गाडीसाठी बुकिंग 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सुरू झाली होती. 30 मिनिटांत 1,00,000 बुकिंग झाले. एवढेच नाही तर पहिल्याच मिनिटात 25 हजार बुकिंग झाले. यासह महिंद्राच्या Scorpio-N एसयूव्हीने नवा विक्रम केला आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या मते, बुक केलेल्या नवीन स्कॉर्पियोची एकूण किंमत 2.3 अब्ज डॉलर म्हणजेच 18,000 कोटी रुपये होते. देशातील कोणत्याही वाहनाचे बुकिंग करण्याचा हा नवा विक्रम आहे. कंपनीने सांगितले की नवीन Scorpio-N ची डिलिव्हरी 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होईल आणि डिसेंबर 2022 पर्यंत कंपनीने 20,000 नवीन Scorpios डिलिव्हरी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पण, कमी बजेटमुळे तुम्ही अजून गाडी बुक केली नसेल, तर तुमच्यासाठी कंपनीनं एक आकर्षक फायनान्स स्कीम आणली आहे. 

महिंद्राने आपल्या फायनान्स पार्टनरसह नवीन Scorpio-N साठी FinN पॅकेज अंतर्गत एक आकर्षक योजना जाहीर केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या फायनान्स स्किम FinN अंतर्गत, ग्राहकांना 6.99 टक्के प्रारंभिक व्याजदराने फायनान्स केला जाईल. कर्जाचा कालावधी कमाल 10 वर्षांपर्यंत असू शकतो. महिंद्राने ऑफर केलेल्या फायनान्स योजनेअंतर्गत, ग्राहकांना कारच्या ऑन-रोड किमतीवर 100% पर्यंत फायनान्स केला जाऊ शकतो. म्हणजेच, कारच्या एक्स-शोरूम किंमतीव्यतिरिक्त, नोंदणी खर्च, विमा, अॅक्सेसरीज, शील्ड, एएमसी आणि कर्ज संरक्षणासाठी देखील निधी दिला जाऊ शकतो.

म्हणजेच तुम्हाला सुरुवातील यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. फक्त बुकिंग करावे लागेल. त्याची बुकिंग रक्कम 21हजार रुपये आहे. तुम्ही आत्ताच गाडी बुक करू शकता आणि नंतर फायनान्सची प्रक्रिया सुरू करू शकता. जर तुम्हाला ऑन रोड किंमतीवर 100% फायनान्स मिळाला तर तुम्हाला हे पैसे परत मिळतील. ही रक्कम देणं क्रेडिट किंवा लोन फायनान्सरच्या स्वतःच्या अटी व शर्तींच्या अधीन असेल. महिंद्राच्या नव्या स्कॉर्पियोची स्पर्धा एमजी हेक्टर, टाटा सफारी, ह्युंदाई अल्कायझार आणि जीप कंपासशी असेल.