BMW ने जाहीर केलंय की त्यांचा दुसरा gen M2 या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च करण्यात येईल. या कारला मॅन्युअल गिअरबॉक्स सोबतच रिअल व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशन देखील मिळणार आहे. M मॉडेलची ही शेवटची कार असेल अशी चर्चा आहे. जी पूर्णपणे इंटरनल कंडीशन इंजन (ICE) वर आधारित असेल.
या कारमध्ये S58 3.0 लीटर स्ट्रेट सिक्स इंजिन असेल जे 450 हॉर्सपावर तयार करेल. इंजिन एकतर 8-स्पीड स्टेपट्रॉनिट ऑटोमेटिक किंवा 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन M2 ची कामगिरी मागील M-2 CS सारखीच असेल. पण, नवीन M2 सेकंड सीरीज कू वर आधारित असणार आहे, जी 2021 मध्ये पहिल्यांदा रीव्हील झाली होती. यात एम-विशिष्ट सस्पेंशन मिळणार आहे. तसेच, या कारमध्ये तुम्हाला मोठे ब्रेक, रीवर्क्ड चेसिस आणि परफॉर्मन्सवर आधारित इंटीरियर देखील मिळणार आहे. यात बकेट सीट देखील असणार आहे जेणेकरुन प्रवासी त्याच्या सीटवर स्थिर राहू शकतील.
BMW ने अजूनतरी किंमतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, पण एका बातमीनुसार, या कारची किंमत सुमारे 40-42 लाख रुपये असू शकते. नवीन BMW M2 स्टाइलिंगच्या बाबतीत M240i प्रमाणेच असणार आहे. कंपनीने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर या कारच्या टेस्टिंगचे फोटो शेअर करण्यात आले.
बीएमडब्ल्यू एम डिव्हिजनचे सीईओ फ्रँक व्हॅन मेल यांनी सांगितल आहे की नवीन एम2 एक उत्तम ड्रायव्हिंग मशीन असणार आहे. जर आपण हे पाहिलं तर M2 हे शेवटची कार असेल जी पूर्णपणे कम्बशन इंजनवर चालेल.
ही कार 2022 च्या शेवटच्या सहामाहीत आंतरराष्ट्रीय शोरूममध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच, BMW जूनमध्ये आयोजित गुडवुड फेस्टिव्हलमध्ये आणखी एक कार M3 ची पहिली झलक दाखवण्याचा विचार करत आहे.