Samsung लॉंच करतोय सर्वांत स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मोबाईल विश्वात दररोज नवनवीन स्मार्टफोन लॉंच होत असतात.

Updated: Jun 18, 2022, 04:19 PM IST
Samsung लॉंच करतोय सर्वांत स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स  title=

मुंबई : मोबाईल विश्वात दररोज नवनवीन स्मार्टफोन लॉंच होत असतात. आता आणखीण एक स्मार्टफोन लॉंचच्या तयारीत आहे. 6000mAh बॅटरी आणि 4 कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन स्वस्तात उपलब्ध असल्याने चर्चेत आला आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात. 

सॅमसंग लवकरच Samsung Galaxy F13 हा नवीन बजेट स्मार्टफोन भारतात लॉंच करणार आहे. येत्या 22 जून रोजी दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लॉन्च होण्याची माहिती समोर आली आहे. 

सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. तसेच हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. 

Samsung Galaxy F13 ची रचना Galaxy M13 सारखीच आहे. दोन्ही स्मार्टफोन्सचे फीचर्सही खूप सारखे असू शकतात. हा फोन Gigabench वर दिसला. चला जाणून घेऊया स्मार्टफोनच्या खास गोष्टी.

फिचर्स 

  • Samsung Galaxy F13 मध्ये, तुम्हाला 
  • फुल HD + LCD पॅनेल, जे शक्यतो 6.6-इंच असू शकते.
  • 6000mAh बॅटरी, जी 15W चार्जिंगला सपोर्ट करेल. 
  • 8GB पर्यंत रॅमचा पर्याय 
  • फोनमध्ये ऑटो डेटा स्विचची सुविधा 
  • 50MP + 5MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
  • गुलाबी, निळा आणि हिरवा या तीन रंगात हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.  

किंमत काय?
स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप माहिती समोर आली नाही आहे. मात्र स्पेसिफिकेशन्सच्या आधारे असे म्हणता येईल की कंपनी 15,000 रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये हा स्मार्टफोन लॉंच करण्याची शक्यता आहे.