तुम्हालाही येतात Spam Calls?;फोनमध्ये करा 'या' सोप्या सेटिंग

सोपी ट्रिक वापरा आणि कधीही येणार नाहीत Spam Calls

Updated: Oct 29, 2022, 12:32 PM IST
तुम्हालाही येतात Spam Calls?;फोनमध्ये करा 'या' सोप्या सेटिंग title=

सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crime) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वेगवेगळ्या नंबरवरुन कॉल (Spam Number) करून लोकांची आर्थिक फसवणूक करण्याची काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. नुकतेच हरियाणा पोलिसांनी अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. अशा गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेले सुमारे 28 हजार स्पॅम क्रमांक पोलिसांनी शोधून काढले आहेत. (block Spam Calls with easy setting in phone)

पोलिसांनी 27,834 स्पॅम क्रमांक शोधले असून ते लवकरच ब्लॉक केले जातील असा दावा केला आहे. पोलीस लवकरच हे क्रमांक सायबरसेफ पोर्टलवर अपलोड करणार आहेत. या यादीतील बहुतांश क्रमांक गुरुग्राममधून चालवले जात होते. त्यापाठोपाठ फरिदाबाद आणि इतर शहरांची नावे स्पॅम कॉलमध्ये (Spam Calls) समोर आली आहेत. फसवणूक करणारे लोकांना बँक (Bank) अधिकारी किंवा इतर कोणत्याही सेवेच्या नावाने कॉल करतात आणि त्यांची फसवणूक करतात. ते टाळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

फसवणूक टाळायची असेल तर ही चूक करू नका
फसवणूक (Fraud) करणारे नेहमी लोकांना अडकवण्यासाठी अशा युक्त्या वापरतात, ज्यामुळे दहशत निर्माण होते. उदाहरणार्थ, ते तुमच्या क्रेडिट कार्डला (Credit card) ब्लॉक किंवा बँकेकडून पैसे कपातीच्या नावाने कॉल करू शकतात.

* पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही घाबरून तुमची कोणतीही माहिती फसवणूक करणाऱ्यांसोबत शेअर करू नका.

* तुमच्या बँकिंग आणि इतर खात्यांसाठी टू-फॅक्टर सेटिंग चालू ठेवा. यामुळे, इतर कोणीही तुमचे खाते सहजपणे हॅक करू शकणार नाही.

* सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमचा ओटीपी (OTP) इतर कोणाशीही शेअर करू नका. आजकाल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून वस्तू आल्यावरही OTP येतो. या दोन OTP मधील फरक समजून घ्या.

* बँकेचा (bank) कोणताही अधिकारी फोन करुन तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारत नाही.

अशा प्रकारे ब्लॉक करा स्पॅम कॉल

 तुम्ही Android फोनवर स्पॅम कॉल्स आपोआप ब्लॉक करू शकता. यासाठी तुमच्या फोनमध्ये गुगल डायलर असायला हवे. जर तुमचे डिफॉल्ट अॅप गुगल डायलर असेल तर तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन सहजपणे स्पॅम कॉल ब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला प्रथम गुगल डायलर (Google Dialer) ओपन करावे लागेल.

सेटिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्‍यात दिसणार्‍या तीन बिंदूंवर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक करताच काही पर्याय तुमच्या समोर येतील, ज्यामध्ये सेटिंगही असेल.

सेटिंगवर क्लिक केल्यावर तुम्हाला कॉलर आयडी आणि स्पॅमचा (Caller ID & Spam) पर्याय मिळेल. तुम्हाला यावर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला सी कॉलर आणि स्पॅम आयडीचे (See Caller and Spam ID) टॉगल चालू करावे लागेल. त्यानंतर फिल्टर स्पॅम कॉल्सचा (Filter Spam Calls) पर्याय चालू करावा लागेल.

यामुळे तुमच्या फोनवर येणारे स्पॅम कॉल्स (Spam Calls) आपोआप ब्लॉक होतील. यामुळे फक्त तेच स्पॅम कॉल ब्लॉक केले जातील, ज्यांना लोकांनी स्पॅम म्हणून घोषित केले आहे.