...तर लवकरच व्हॉट्सअॅप होईल बंद!

जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरता तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जगभरात वापरले जाणारे व्हॉट्सअॅप अडचणीत आलेय आणि याचे कारण आहे ब्लॅकबेरी.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Mar 9, 2018, 10:30 AM IST
...तर लवकरच व्हॉट्सअॅप होईल बंद! title=

मुंबई : जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरता तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जगभरात वापरले जाणारे व्हॉट्सअॅप अडचणीत आलेय आणि याचे कारण आहे ब्लॅकबेरी.

ब्लॅकबेरीने फेसबुकवर एक खटला दाखल केलाय. यात ब्लॅकबेरीने फेसबुकवर मेसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसाठी आपली टेक्निक वापरल्याचा आरोप केलाय. ब्लॅकबेरीने दावा केलाय की हे त्यांचे पेटंट आहे. फेसबुक इन्स्टंट मेसेजिंग अॅप, व्हॉट्सअॅपमध्ये ब्लॅकबेरीच्या टेक्निकचा वापर करण्यात आलाय. 

दी़ड दशकाआधी ब्लॅकबेरी मेसेंजर युसर्जसमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जात असेत. आता ब्लॅकबेरीने असा दावा केलाय की फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपमध्ये जी टेक्निक वापरण्यात आलीये ती ब्लॅकबेरीने डेव्हलप केलीये. ब्लॅकबेरीने असंही म्हटलंय की फेसबुकने आमची इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी चोरलीये. त्यामुळे फेसबुक मेसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम बंद केले जावे.

फेसबुकने चोरले अनेक फीचर्स

दरम्यान, ब्लॅकबेरीकडून अद्याप कोणतीही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाहीये. मात्र कंपनीला आर्थिक नुकसानीची भरपाई हवीये. ब्लॅकबेरीच्या म्हणण्यानुसार, फेसबुकने त्यांचे अनेक फीचर्स चोरलेत. या आरोपांवर फेसबुकचे डेप्युटी जनरल काऊंसिल पॉल ग्रेवाल म्हणाले ब्लॅकबेरी नवे काही शोधण्याऐवजी दुसऱ्यांनी शोधलेल्या गोष्टींवर टॅक्स लावण्याचा प्रयत्न करतोय. 

फेडरल कोर्टात दाखल केला खटला

ब्लॅकबेरीने याप्रकरणी लॉस अँजेलिसच्या फेडरल कोर्टात खटला दाखल केलाय. याआधी फेब्रुवारी २०१७मध्ये ब्लॅकबेरीने नोकियावर ३जी आणि ४ जी वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या पेटंटप्रकरणी खटला दाखल केला होता.