Suzuki ची V-Strom 800DE ची भारतात दाखल; बाईकची किंमत पाहून बसेल धक्का

Suzuki V Strom 800DE Unveiled Price In India: मागील काही वर्षांमध्ये स्पोर्ट्स बाईकची प्रमुख बाजारपेठ म्हणून भारतीय दुचाकी बाजरपेठेकडे पाहिलं जात आहे. जगभरातील वेगवेगळ्या कंपन्या महागड्या बाईक्स भारतामध्ये लॉन्च करत आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 1, 2024, 04:18 PM IST
Suzuki ची V-Strom 800DE ची भारतात दाखल; बाईकची किंमत पाहून बसेल धक्का title=
मार्चपासून बाजारात उपलब्ध होणार

Suzuki V Strom 800DE Unveiled Price In India: भारत मोबिलिटी एक्स्पो 2024 मध्ये सुझूकी कंपनीने सुझूकी व्ही-स्ट्रोम 800 ईडी (Suzuki V-Strom 800DE) पहिल्यांदाच समोर आणली आहे. तसेच सुझूकी कंपनीने जीएसएक्स- 8 आर ही स्पोर्ट्स बाईकही बाईकप्रेमींना पहिल्यांदाच दाखवली आहे. ट्रायम्फ टायगर 900, बीएमडब्ल्यू एफ 850 जीएस आणि होंडा ट्रान्सअल्प 750 सारख्यांना सुझूकीची ही नवी बाईक टक्कर देणार आहे.

भारतात आयात केली जाणार सुझूकी व्ही-स्ट्रोम 800 ईडी बाईक

सुझूकी व्ही-स्ट्रोम 800 ईडी ही बाईक मार्च 2024 मध्ये प्रत्यक्षात बाजारात उपलब्ध होणार आहे. या बाईकसाठीचं बुकींग लॉन्चिंगच्या तारखेच्या आसपासच सुरु होईल. ही बाईक भारतामध्ये आयात केली जाणार असल्याने ही बाईक प्रिमिअम रेंजची असेल याबाबत शंका नाही.

बाईकचं इंजिन कसं आणि त्याची क्षमता किती?

सुझूकी व्ही-स्ट्रोम 800 ईडी बाईकमध्ये 776 सीसी, पॅरलल ट्वीन मोटर असणार आहे. इंजिनची क्षमता 83 बीपीएच आणि टॉर्क 78 एनएम इतकी आहे. इंजिनला 6 स्पीड गेअर बॉक्स आहेत. मोटारसायकलमध्ये स्टीलची चेसिस आहे. पुढील बाजूला Showa USD फोर्क्स आहेत. तर मागील बाजूस प्रीलोड-ॲडजस्टेबल मोनोशॉकर आहेत. या बाईकच्या स्पोक व्हील सेटअपमध्ये पुढचा टायर 21-इंचांचा तर मागील टायर 17-इंचांचा आहे. 

दिसायला कशी आहे सुझूकी व्ही-स्ट्रोम 800 ईडी?

सुझूकी व्ही-स्ट्रोम 800 ईडी ही बाईक दिसायला फारच सुंदर आहे. बाईकचा लूक फारच स्पोर्टी आहे. 'सुझूकी व्ही-स्ट्रोम 800 ईडी'मध्ये 5-इंचांचा TFT, LED इल्युमनेशन, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, राइड-बाय-वायर थ्रॉटल देण्यात आला आहे. तसेच या बाईकमध्ये बाय डारेक्शनल क्विकशिफ्टर, मल्टीपल राइड मोडसहीत इतरही अनेक वैशिष्ट्यं असतील असं कंपनीचं म्हणणं आहे.

सुझूकी व्ही-स्ट्रोम 800 ईडीची किंमत?

सुझूकी व्ही-स्ट्रोम 800 ईडी बाईक आयात केली जाणार असल्याने तिची किंमत 10 लाखांपासून पुढेच असेल. एका अंदाजानुसार या बाईकची किंमत 11 लाखांपर्यंत असू शकते. मागील काही वर्षांमध्ये स्पोर्ट्स बाईकची प्रमुख बाजारपेठ म्हणून भारतीय दुचाकी बाजरपेठेकडे पाहिलं जात आहे. जगभरातील वेगवेगळ्या कंपन्या महागड्या बाईक्स भारतामध्ये लॉन्च करत आहेत. या बाईक प्रिमिअम सेक्शनमधील असल्याने त्याला मोठ्याप्रमाणात ग्राहक नसतील असं वाटतं असलं तरी या बाईक्सला उत्तम मागणी असून कंपन्यांना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बाईकप्रेमींकडून या बाईक्सचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं जात आहे.