मुंबई : तुम्ही व्हॉटसअॅपवर कुणाशी काय चॅट करताय, यावर कुणाची तरी नजर असू शकते? असं म्हणण्यामागे कारण म्हणजे याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
व्हॉटसअॅपची मालक कंपनी फेसबुकने इस्रायलच्या NSO ग्रुपविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात तब्बल १४०० युझर्सचे व्हॉटसअॅप अकाऊंट हॅक केल्याचा आरोप आहे. यामध्ये २० देशांमधले पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या अकाऊंट्सचा समावेश आहे.
व्हॉ़टसअॅपवरच्या या हल्ल्याचं नाव पेगासस असं आहे. इस्रायलमधली एजन्सी NSOने हे पेगासस तयार केलं. व्हिडिओ कॉल सुरु असताना हॅकिंग करण्यात आलं. व्हॉटसअॅपच्या व्हिडिओ कॉलमध्ये एक त्रुटी राहिली होती. त्याचा फायदा घेत १४०० युझर्सच्या अकाऊंट्समध्ये व्हायरस घुसवण्यात आला.
मात्र, इस्रायलच्या NSO ग्रुपने हे आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे व्हॉटसअॅप जरा जपून वापरा.