Smartphone Battery Life: सध्या प्रत्येकाच्या हातात आपल्या मोबाईल पाहायला मिळतो. पण एक दोन तास मोबाईलमध्ये घुसलं की पुन्हा एकदा बॅटरी चार्ज गरज भासते. जर तुमचा फोन जुना झाला असेल तर मग ही तर रोजचीच कटकट असते. त्यामुळे अनेक जण जवळ बॅटरी बॅकअप ठेवतात. पण तुमच्या स्मार्टफोनची बॅटचरी एकदा चार्ज केली की, बॅकअप न वापरता दिवसभर वापरू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच टिप्स सांगणार त्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी दिवसभर टिकेल.
ओरिजनल चार्जर: तुम्ही नवा कोरा स्मार्टफोन बाजारातून घेतल्यानंतर त्यासोबत ओरिजनल चार्जर येतो. या चार्जरने फोन व्यवस्थित चार्ज होते. त्याचबरोबर बॅटरीची लाईफसुद्धा चांगली राहते. पण एकदा चार्जर खराब झाला तर मार्केटमधून स्वस्त चार्जर विकत घेतो. पण असं केल्याने बॅटरी खराब होते आणि परफॉर्मन्स हवा तसा मिळत नाही. त्यामुळे ओरिजनल चार्जर वापरावा.
स्टोरेज फ्री: जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा स्टोरेज भरलेलं असेल तर प्रोसेसरवर प्रेशर येतं आणि बॅटरी जास्त प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे बॅटरीच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. यासाठी गरजेनुसार स्टोरेज रिकामी करण आवश्यक आहे. त्यामुळे बॅटरी लाईफ वाढते.
स्मार्टफोन रिबूट करा: जर तुम्ही वेळोवेळी तुमचा स्मार्टफोन रिबूट करत असाल तर बॅटरी व्यवस्थितरित्या काम करेल. स्मार्टफोन रिबूट केल्याने बॅटरीची क्षमता वाढते आणि स्पीड दिसून येतो. पण महिनाभर जर तुमचा स्मार्टफोन रिबूट केला नाही बॅटरी क्षमता कमी होत जाते.
मोठ्या फाईल्स डिलिट करा: जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हेवी फाइल्स असतील तर लगेच डिलिट करा. कारण यामुळे प्रोसेसरवर प्रेशर येतं. बॅटरी अनावश्यक कामासाठी वापरली जाते. त्यामुळे हेवी फाईल्स लगेच ट्रान्सफर केल्या पाहीजेत. यामुळे बॅटरीचं लाईफ वाढतं.