या मोबाईलवर जिओ देणार 100GB जास्त डेटा

Asusच्या मोबाईलवर रिलायन्स जिओ वापरणाऱ्या ग्राहकांना आता 100GB जास्त इंटरनेट डेटा मिळणार आहे.

Updated: Jul 10, 2017, 05:58 PM IST
या मोबाईलवर जिओ देणार 100GB जास्त डेटा  title=

मुंबई : Asusच्या मोबाईलवर रिलायन्स जिओ वापरणाऱ्या ग्राहकांना आता 100GB जास्त इंटरनेट डेटा मिळणार आहे. जिओ आणि Asusमध्ये या ऑफरसाठी पार्टनरशीप झाली आहे. 100GB जास्तचा इंटरनेट डेटा हा 4G असणार आहे. १६ जूननंतर Asusचा मोबाईल विकत घेतलेल्यांना ही ऑफर मिळणार आहे.

Asusचा मोबाईल असणाऱ्यांना रिलायन्स जिओचं ३०९ रुपयांचं रिफील केल्यानंतर हा अधिकचा डेटा मिळणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहक एकूण १० रिचार्ज करू शकणार आहे. ३१ मार्च २०१८ याची शेवटची तारीख असणार आहे.

या ऑफरचे तीन वेगवेगळे भाग करण्यात आले आहेत. पहिल्या भागामध्ये Asus Zenfone Selfie, Asus Zenfone Max, Asus Zenfone Live, Asus Zenfone Go 4.5, Asus Zenfone Go 5.0, और Asus Zenfone Go 5 या स्मार्टफोनचा समावेश आहे. या स्मार्टफोनवर 3GB जास्तचा डेटा मिळणार आहे.

दुसऱ्या भागामध्ये Asus Zenfone 2, Asus Zenfone 2 Laser, Asus Zenfone 2 Laser 5.5, Asus Zenfone 3S Max, Asus Zenfone 3 Laser, Asus Zenfone 3 Max 5.2 आणि Asus Zenfone 3 Max 5.5 या स्मार्टफोनचा समावेश आहे. या स्मार्टफोनवर 5GB 4G अतिरिक्त डेटा मिळेल.

तिसऱ्या भागामध्ये Asusच्या प्राईम हँडसेटचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये Asus Zenfone Zoom, Asus Zenfone 3 Deluxe, Asus Zenfone 3 Ultra, Asus Zenfone 3 5.2 आणि Asus zenfone 35.5 यांचा समावेश करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रत्येक रिचार्जवर 10GB डेटा म्हणजेच एकूण 100GB जास्तचा 4G डेटा मिळणार आहे. जिओची प्राईम मेंबरशीप असणाऱ्यांसाठीच ही ऑफर लागू आहे.