Deepfake Photos and Videos: जगभरात AIचा वापर वाढला आहे. भारतातही AIचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, फायद्याबरोबरच काही नुकसानदेखील झेलावे लागत आहेत. एका रिपोर्टनुसार, AIचा भयावह चेहरा समोर आला आहे. अनेक जण AIचा वापर महिलांविरोधात करताना दिसत आहे. महिलांचे फोटो वापरुन त्यांचा गैरवापर करण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे, मोठ्या प्रणाणात त्याचा वापर केला जात आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यातच 24 मिलियन लोकांनी या साइटवर व्हिजिट केलं आहे.
सोशल नेटवर्क एनालिसिस कंपनी ग्राफिकाने याबाबत एक रिपोर्ट जारी केली आहे. निर्वस्त्र आणि न्यूडिफाय सर्व्हिसच्या मार्केटिंगसाठी काही कंपन्या लोकप्रिया सोशल नेटवर्क साइटचा वापर करत आहेत. संशोधनानुसार, ट्विटर आणि रेडिटसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मार्केटिंगमध्ये 2400 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. कोणताही फोटो निर्वस्त्र करण्यासाठी AIचा वापर केला जात आहे. या साइट्स जास्तकरुन महिलांविरोधातच काम करत आहे.
हे अॅप्स आता लोकांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे. या रिपोर्टमुळं पुन्हा एकदा पोर्नोग्राफीचा मुद्दा समोर आला आहे. AIच्या मदतीने हे फोटो विविध ठिकाणी पाठवण्यातही येत आहेत. सोशल मीडियावरुन महिलांचे फोटो विनापरवानगी वापरण्यात येत आहेत. तसेच या फोटोचा वापर करुन ते सहमतीशिवाय व्हायरल करण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे, अद्याप अशा अॅप्सवर कोणतीही कारवाईदेखील करण्यात आलेली नाही.
ग्राफिकाच्या अॅनालिस्ट रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, तुम्ही AIच्या मदतीने सगळंकाही क्रिएट करु शकता आणि विशेष म्हणजे हे सगळं काही खरं असल्यासारखं वाटतं. AIहे ओपन सोर्स आहे कोणीपण त्याचा वापर करु शकतं. अशा अॅप्सतर फ्रीमध्ये सर्व्हिस देतात. त्यामुळं कमी दिवसांतच या अॅप्सची लोकप्रियता खूप वाढली आहे.
या अॅपच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा अश्लील व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकण्यात येतो. हे अॅप्स AIच्या मदतीने कोणाचाही आपत्तीजनक व्हिडिओ बनवू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, याचा वापर डिपफेक पॉर्नोग्राफीसाठी केला जातो. व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन घेतले जातात आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने व्हायरल केले जाते.