गुगलकडून डिलीट करण्यात आले तब्बल 17 अ‍ॅप, संपूर्ण यादी पाहा

Goole Remove 17 Apps: गुगलकडून 17 अ‍ॅप्स डिलीट करण्यात आले आहेत. युजर्सच्या सुरक्षिततेसाठी गुगलकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 9, 2023, 01:39 PM IST
गुगलकडून डिलीट करण्यात आले तब्बल 17 अ‍ॅप, संपूर्ण यादी पाहा title=
Google Remove 17 Apps From Play Store

Goole Remove 17 Apps:  युजर्सच्या सुरक्षेसाठी गुगलकडून नेहमीच कठोर पावलं उचलली जातात. अलीकडेच गुगलने 17 Spy Loan Apps डिलीट केले आहेत. हे अ‍ॅप्स प्ले स्टोअरमधून लाखो लोकांनी डाउनलोडदेखील केले आहेत. सॉफ्टवेअर कंपनी ESET ने अलीकडेच याबाबत एक नवीन रिपोर्ट जारी केली आहे. यात म्हटलं आहे की, 17 अ‍ॅप्स हे SpyLoan अ‍ॅप्स म्हणून कार्यरत होते. 

गुगलकडून डिलीट करण्यात आलेले अ‍ॅप्स हे धोकादायक असल्याचे म्हणण्यात येत आहे. या अ‍ॅप्समधून युजर्सचा डेटा विनापरवानगी चोरी करण्यात येत होता. तुमच्या फोनमध्ये देखील हे अ‍ॅप असेल तर आजच हे अ‍ॅप्स डिलीट करा. या अ‍ॅप्सचा माध्यमातून कर्ज घेणाऱ्या युजर्सना ब्लॅकमेल केले जात होते. तसंच फोनमधून डेटा चोरुन या युजर्सना कर्जाचे रिपेमेंट करण्यासाठी धमकावत होते. त्याचबरोबर युजर्सकडून जास्त व्याजाची रक्कमही वसुल करत होते. 

ESET रिसर्चरने हे अॅप्स शोधून काढले आहेत. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून युजर्सची फसवणूक करण्यात येत होती. अफ्रीका, लॅटीन अमेरिका आणि साउथ ईस्ट एशियासारख्या युजर्सना टार्गेट करत आहेत. याबाबत जेव्हा गुगलला माहिती मिळाली तेव्हा कारवाई करत गुगल प्ले स्टोअरमधून हे 17 अॅप्स काढून टाकण्यात आले आहेत. जर तुमच्या मोबाईल फोनमध्येही हे अॅप्स डाऊनलोड केले असतील तर लगेचच हे अ‍ॅप्स डिलीट करा. 

हे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरमधून रिमूव्ह

AA Kredit, Amor Cash, GuayabaCash, EasyCredit, Cashwow, CrediBus, FlashLoan, PréstamosCrédito, Préstamos De Crédito-YumiCash, Go Crédito, Instantáneo Préstamo, Cartera grande, Finupp Lending, 4S Cash, TrueNaira, EasyCash

आत्ताच करा अ‍ॅप डिलीट

तुमच्या फोनमध्येही यापैकी काही अ‍ॅप्स  असतील तर ते तातडीने डिलीट करणेच योग्य राहिलं. कारण यामुळं तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. किती भारतीयांच्या फोनमध्ये असे अ‍ॅप्स आहेत याबाबत अद्याप कंपनीकडून काहीच सांगण्यात आलेलं नाहीये.